अयोध्येत 14 कोटींची जमीन खरेदी केल्यानंतर Big B नी अलिबागमध्ये विकत घेतली तब्बल एवढ्या किमतीची मालमत्ता
बिग बींच्या जमीन खरेदीबद्दल एक महत्वाची माहिती समोर येत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईजवळील अलिबागमध्ये 10 हजार स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली आहे. ज्याची किंमत १० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने ‘द हाऊस अँड अभिनंदन लोढा’ अंतर्गत ही जमीन खरेदी केली आहे. मात्र बिग बी किंवा ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्याकडून ही जमीन खरेदी करण्याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.(Amitabh Bachchan New Property)
हिंदुस्थान टाईम्समध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, बिग बींनी ‘ए अलिबाग’ प्रकल्पांतर्गत ही जमीन खरेदी केली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्येच हा प्रकल्प सुरू झाला आहे. यापूर्वी अयोध्येत बिग बी आणि या प्रकल्पाचे निर्माते यांनी विकत घेतलेली जमीन एकच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींनी अयोध्येत खरेदी केलेल्या 10 हजार स्क्वेअर फूट जागेची किंमत जवळपास 14.5 कोटी रुपये आहे.
अलीकडच्या काळात मुंबईला लागून असलेले अलिबाग हे शहर रिअल इस्टेटसाठी लोकांची पहिली पसंती ठरत आहे. मुंबईपासून जवळ असल्याने येथील भागात जमिनीचे दरही वर्षागणिक वाढत आहेत. तसेच लोक ही येथे जमीन खरेदी करण्यास खूप पसंती देत आहेत. काही दिवसांपूर्वीत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी जुहू येथील आपला ‘प्रतीक्षा‘ बंगला मुलगी श्वेता बच्चन हीला भेट म्हणून दिला आहे.
===============================
===============================
प्रतीक्षा हा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा जुहूमध्ये खरेदी केलेला पहिला बंगला होता, जो त्यांनी ‘शोले’च्या यशानंतर खरेदी केला होता. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर Kalki 2898 AD चित्रपटातील बिग बींचा लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये बिग बींचे तीक्ष्ण डोळे दिसत असून संपूर्ण तोंड कापडाने झाकल्याचे पहायला मिळत आहे.