जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

Neena Gupta यांनी ‘कोल्हापुरी’ चपलेचा व्हिडिओ शेअर करत लक्ष्मीकांत बेर्डेंचे मानले आभार!
महाराष्ट्रातल्या असंख्य गोष्टी जगात भारी आहेत… त्यातच कोल्हापूरी चपलेचा नादच वेगळा… प्राडा (PRADA Fashion Brand) या फॅशन ब्रॅण्डने त्यांच्या स्प्रिंग-समर कलेक्शनमध्ये कोल्हापूरी चपलांना प्रमोट केलं.. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरी चपलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली हे चांगलंचं आहे पण त्यांनी कुठलंच प्रेडिट न देता स्वत:चं प्रोडक्ट असल्याचं सांगितलं. गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या कोल्हापूरातल्या या ‘कोल्हापुरी’ची क्रेझ जगभरात असून प्राडानं ‘कोल्हापुरी’चं क्रेडिट कोल्हापूरला न दिल्यामुळे लोकांच्या ट्रोलिंगला प्राडाला सामना करावा लागला… आता यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला असून करिना कपूर, नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी खास फोटो-व्हिडिओ शेअर केले आहेत.. नीना गुप्ता यांनी चक्क कोल्हापूरीसाठी दिवंगत ज्येष्ठ विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आभार मानले आहेत…(Entertainment)

नीना गुप्तांनी ‘कोल्हापुरी’साठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी जी कोल्हापूरी चप्पल घातली आहे ती त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आणून दिली होती… नीना यांनी व्हिडिओत लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची आठवण सांगत म्हटलं आहे की, “मी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही मला कोल्हापूरहून ही कोल्हापुरी चप्पल आणून द्याल का? तेव्हा त्यांनी लगेच हो म्हटलं होतं. त्यांनी मला ही कोल्हापुरी चप्पल आणून दिली होती. ही माझ्याकडे असलेल्या असंख्य चपलांपैकी सगळ्यात सुंदर चप्पल आहे, आणि ती हातानं बनवलेली आहे…थॅंक्यू लक्ष्मीकांत…तुम्ही आमच्यासोबत आता नाही आहात,पण खूप प्रेम…”(Bollywood News)
================================
=================================
दरम्यान, नीना गुप्ता यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आभार मानल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे… तसेच, करिना कपूर (Kareena Kapoor) हिने देखील समुद्रकिनारी बसून पायात कोल्हापूरी चप्पल घातलेला फोटो शेअर करत “सॉरी प्राडा नाही…पण माझी ओरिजनल कोल्हापुरी चप्पल” (Kolhapuri Chappal) असं कॅप्शन देत प्राडाला टोमणा मारला आहे… केवळ नीना गुप्ता किंवा करिनाच नाही तर बॉलिवूडचे बरेचसे सेलिब्रिटी बऱ्याचवेळा कोल्हापूरी चप्पल घालून स्पॉट होतात.. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी आपल्या कोल्हापूरी चपला प्रसिद्ध झाल्या असल्या तरी प्राडाने क्रेडिट तर दिलंच पाहिजे हे बरेचसे कलाकार नकळत सांगून जात आहेत…(PRADA and Kolhapuri Chappal)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi