सलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर आता शाहरुख खानच्या सुरक्षेतही वाढ
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा सतत चर्चेत असतो. काहीच महिन्यांपूर्वी सलमानचा ‘एक था टायगर’ चित्रपट प्रदर्शित झाला. सलमानच्या या कमबॅक फिल्मला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर सलमानच्या पुढील चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली. एका चित्रपटातील थरारक सीनसारखाच थरार नुकताच मुंबईच्या बांद्रा परिसरातील सलमान खानच्या घराबाहेर अनुभवायला मिळाला. रविवारी पहाटे दुचाकीवर आलेल्या दोघांनी सलमान खानचे घर गॅलेक्सि अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला.
याआधीही सलमान खानला (Salman Khan) मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आतापर्यंत सलमानला फक्त जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आणि फोन कॉल्स येत होते, मात्र आता थेट त्याच्या घरावरच हल्ला झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बिशनोई गॅंगने घेतली. लॉरेन्स बिशनोई हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलंच असेल. कॅनडाच्या जेलमध्ये असलेला कुख्यात गँगस्टर!
हेदेखील वाचा : अमर सिंह चमकीलाने मोडलेला चक्क अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ रेकॉर्ड
गेली कित्येक वर्ष तो सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे. बिशनोई हा पंजाबमधील एक कुख्यात गुंड असून त्याच्यावर खून, दरोडे, खंडणीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर बिशनोई अधिक चर्चेत आला. यानंतर बिशनोई हा सलमान खानवर डुक धरून् आहे.
२०२२ पासून तो सलमानचा (Salman Khan) काटा काढण्यासाठी वेगवेगळे सापळे रचतो आहे. ईमेल, पत्रं यांच्या माध्यमातून बिशनोई सतत सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता अन् आता तर त्याची मजल थेट सलमानच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यापर्यंत गेली. सलमानच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याने सारं बॉलिवूड हादरलं.
हे प्रकरण इतकं तापलं की थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानच्या (Salman Khan) घरी जाऊन त्याची व त्याचे वडील सलीम खान यांची भेट घेतली. सलमानवर झालेला हा हल्ला पाहता आता त्याच्याच परिसरात काहीच अंतरावर राहणाऱ्या बॉलिवूडच्या किंग खान म्हणजे शाहरुख खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आपल्या आयपीएल टीमला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख गेले चार दिवस कलकत्तामध्येच होता, पण तो नुकताच तडकाफडकी मुंबईत परतला आहे. शाहरुखच्या काही फॅन पेजेसनी त्याचे हे परतण्याचे व्हिडिओज शेयर केले आहेत. या व्हिडिओमध्ये शाहरुख सिक्युरिटीच्या गराड्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवाय विमानतळावरही शाहरुखला प्रचंड सुरक्षेत बाहेर आणताना फोटोग्राफर्सनाही त्याच्या जवळपासही फिरकायला मिळालं नसल्याचं या व्हिडिओजवरुन स्पष्ट होत आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार सलमानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या घटनेनंतर शाहरुखसाठीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर झालेल्या घटनेची पुनरावृत्ति होऊ नये यासाठी ही सगळी सोय केल्याचं सांगितलं जात आहे.
सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. १९९८ साली ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमध्ये काळवीटची हत्या केल्याचा आरोप सलमान खानवर (Salman Khan) करण्यात आला होता. यामुळे बिश्नोईने त्याला सातत्याने धमकी दिली होती. बिश्नोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानले जाते यामुळेच काळवीट हत्या प्रकरणापासून सलमान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर होता. परंतु, इतर सर्व टोळ्यांप्रमाणे बिश्नोईची टोळीही सातत्याने चर्चेत राहण्याकरिता हाय प्राफोईल लोकांना टार्गेट करते, असं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं.
काही महिन्यांपूर्वी सलमान खानला (Salman Khan) त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवरही मारायचा मास्टर प्लान लॉरेन्स बिश्नोईने आखला होता पण त्यातही अपयशी ठरला. सलमानला मिळणाऱ्या धमक्या पाहता त्याला सरकारकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून् त्याला स्वसंरक्षणासाठी पिस्तूल बाळगण्याचीही परवानगी देण्यात आली आहे आणि आता शाहरुखलाही तितकीच सुरक्षा दिल्याने याबद्दल आणखी चर्चा होऊ लागली आहे.