यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

“मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण…”; Ajinkya Deo बॉलिवूडमधील लॉबीबद्दल स्पष्टच बोलले
मराठीतील डॅशिग आणि हॅंडसम हिरो अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी आजवर अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय भूमिका साकारल्या… द ग्रेट रमेश देव यांचे सुपूत्र असणाऱ्या अजिंक्य यांनी स्वत:च्या टॅलेंटवर इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं… मराठी चित्रपटसृष्टीत तर त्यांचा पगडा जड होताच; पण हिंदीतही त्यांनी आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला परंतु यश काही मिळालं नाही…. अजिंक्य देव यांनी बरेच चित्रपट केले पण त्यांचं नाव कायमच जोडलं गेल ते ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi movie) या चित्रपटाशी… हिंदीत अॅक्शन हिरो बनायचं स्वप्न पाहिलेल्या अजिंक्य यांच्या नशीबी अपयश आलं… नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे… नेमकं ते काय म्हमाले जाणून घेऊयात…(Cult Classic movies of Indian cinema)

‘कॅचअप’ युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव म्हणाले की, “अॅक्शन हिरो व्हायचं म्हणून मी हिंदीत शिरलो होतो. प्रयत्न करत होतो. अक्षय कुमार, अजय देवगणही तेव्हाच आले होते. आम्ही एकत्र कामंही केलं. अक्षयसोबत मी तेव्हा ‘पांडव’ सिनेमा केला होता. मी मराठीतला एकदम मोठा स्टार आहे या दृष्टीने ते माझ्याकडे बघायचे. मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण मराठी अभिनेता म्हणून मला त्या लॉबीने शिरु दिलं नाही. अडचणी आल्या. माझ्या वडिलांनी रमेश देव यांनी तो खरं ब्रेक केला होता. डॉ. लागू, नाना पाटेकर यांनीही ९० च्या दशकात तो ब्रेक केला होता. पण माझ्या वेळी अनेक स्टारकिड्स आले. कुमार गौरव, अजय देवगण, सनी देओल आम्ही सगळे एकाच काळातले आहोत. नंतर शाहरुखचा काळ आला.”

अजिंक्य पुढे म्हणाले की, “मला वाटतं माझ्यातही काहीतरी कमी असेल. मी डान्स नीट शिकायला हवा होता. कदाचित मीही ती लॉबी ब्रेक करु शकलो असतो. पण मी माझ्या एकाच कलेवर अवलंबून होतो. तेव्हाच बाबांनी निर्मिती संस्थाही सुरु केली होती. मग त्यांच्याबरोबर काम करायला लागायचं, मदत करायची. हे सगळं होत असायचं. त्यामुळे कुठेतरी माझीही चूक आहे. दुर्लक्ष झालं असेल. मी थोडा निष्काळजी वागलो असेल. पण आज मी अनेक मोठे सिनेमे करत आहे आणि चांगल्या भूमिका करत आहे.” (Entertainment News)
अजिंक्य देव असं देखील म्हणाले की, “मला वाटतं माझ्यातही काहीतरी कमी असेल. मी डान्स नीट शिकायला हवा होता. कदाचित मीही ती लॉबी ब्रेक करु शकलो असतो. पण मी माझ्या एकाच कलेवर अवलंबून होतो. तेव्हाच बाबांनी निर्मिती संस्थाही सुरु केली होती. मग त्यांच्याबरोबर काम करायला लागायचं, मदत करायची. हे सगळं होत असायचं. त्यामुळे कुठेतरी माझीही चूक आहे. दुर्लक्ष झालं असेल. मी थोडा निष्काळजी वागलो असेल. पण आज मी अनेक मोठे सिनेमे करत आहे आणि चांगल्या भूमिका करत आहे.”
================================
================================
अजिंक्य देव ‘घरत गणपती’, ‘मी आणि अमायरा’ या मराठी चित्रपटांमध्ये नुकतेच झळकले होते.. तसेच, आगामी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana Movie) आणि ‘१२० बहाद्दर’ चित्रपटातही ते झळकणार आहेत… याव्यतिरक्त आजवर ,’माझं घर माझा संसार’, ‘सर्जा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘संसार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत…(Ajinkya Deo Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi