Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

सुपरस्टार Dev Anand पाहायचे ‘हा’ मराठी कार्यक्रम!

Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार

‘Chala Hava Yeu Dya 2′ च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास

Ramayana : साई पल्लवीच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल्या टेलिव्हिजनच्या ‘सीता माता’?

Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी

Satyabhama Movie : सती प्रथेवर आधारलेला ‘सत्यभामा’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

OTT Release July :Special Ops 2 ते ‘आप जैसा कोई’;

Kantara Chapter 1 : ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चं पोस्टर रिलीज; रुद्रावताराने

अभिनयापूर्वी आपल्याच वडिलांना Direct करणारा Ranbir Kapoor!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अक्षयनंही ठेवलं फॅशनच्या जगात पाऊल

 अक्षयनंही ठेवलं फॅशनच्या जगात पाऊल
कलाकृती विशेष

अक्षयनंही ठेवलं फॅशनच्या जगात पाऊल

by Team KalakrutiMedia 11/12/2022

अक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणा-या अक्षय कुमारनं (Akshay Kumar) आता आपला कपड्यांचा ब्रॅंड केला आहे. फोर्स नाइन (Force IX) नावानं असलेल्या या फॅशन ब्रॅंडची घोषणा अक्षयनं केली असून त्यासाठी तो लवकरच शानदार समारंभात लॉंच करणार आहे. अक्षय (Akshay Kumar) काय स्वतः साध्या कॉटनच्या कपड्यांना पहिली पसंती देतो. त्यामुळेच अशा कपड्यांचा फॅशन ब्रॅंड करायचा विचार त्यांन केला.  आपल्या चाहत्यांना ही कपड्यांची नवी रेंज नक्की आवडेल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे.अक्षयच्या आधीही अनेक अभिनेत्यांनी आपले  फॅशन ब्रॅंड लॉंच केले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऋतिक रोशनचा HRX हा ब्रॅंडही युवकांमध्ये लोकप्रिय आहे. वेगळे रंग आणि कपड्यांच्या साध्या पण लक्षवेधी फॅशनमुळे ऋतिकचा हा ब्रॅंड कमी अवधितच लोकप्रिय झाला. आता अक्षयनंही या फॅशनच्या जगात पाऊल ठेवलं आहे. 

 अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपल्या फोर्स IX संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. एरवी अक्षय आपल्या घरामध्ये कुठलेही फोटो शुट करत नाही. पण आपल्या ब्रॅंडचे लॉंचिग करण्यासाठी त्यांनी चक्क त्याचे घर चाहत्यांना दाखवले आहे.  एवढचं नव्हे तर अक्षयनं (Akshay Kumar) त्याचा वॉडरोबही चाहत्यांपुढे खुला केला असून असेच कपडे फोर्स IX या ब्रॅंडमध्ये असतील असे सांगितले आहे. या व्हिडोओमध्ये अक्षयनं त्याच्या कपड्यांच्या आवडीबाबत सांगितले आहे.  जर मला शक्य असेल तर मी दररोज ट्रॅक पॅंट घालू शकतो, दररोज हुडी घालू शकतो, पातळ टी-शर्ट घालू शकतो. असेच कपडे मी माझ्या चाहत्यांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. ज्यांचा रंग सुखद असेल आणि ते घातल्यावर आरामदायी वाटेल, असेही त्यानं स्पष्ट केलं आहे.  अक्षयच्या या फोर्स IX फॅशन ब्रॅंडसाठी तरुण डिझायनर्सची टिम काम करीत आहे.  या कपड्यांसाठी लागणारे सर्व सामान भारतीय असून कपडे बनवण्याचे कामही आपल्याच देशात होणार असल्याचे अक्षयनं सांगितलं आहे.  

अक्षयच्या आधी ऋतिक रोशनंही या फॅशनच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे.  स्वतः लोकप्रिय अभिनेता असलेल्या ऋतिकने त्याच्या कपड्यांच्या ब्रॅंडसाठी टायगर श्रॉफला अॅम्बेसेडर केले आहे. HRX हा ऋतिकचा फॅशन ब्रॅंड तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.  ऋतिक आणि टायगर दोघेही बॉलिवूडमधील सर्वोत्तम डान्सर म्हणून ओळखले जातात. दोघांचेही ऋतिकच्या ब्रॅंडचे कपडे घातलेले व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत असतात. HRX मध्ये कपड्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतातच शिवाय फिटनेस फॅशन हा सुद्धा त्यातला प्रकार लोकप्रिय ठरला आहे.  अॅथलेझर हा त्यातला नवा ट्रेंड असून त्याला चांगलीच मागणी आहे.  याशिवाय पादत्राणांमध्ये ऋतिकच्या ब्रॅंडनं आघाडी घेतली असून पुढच्या काही वर्षात देशभारत या ब्रॅंडची नवी शॉप चालू होणार आहेत.  ऋतिकच्या या ब्रॅंडला कोरोनाकाळातही चांगलाच फायदा झाला. ऑनलाईन खरेदीमध्ये ऋतिकच्या HRX या ब्रॅंडला अधिक पसंती मिळाल्याचे आढळून आले आहे.  त्यामुळेच ऋतिक आता भारतात HRX फ्रँचायझी शोरूम सुरू करण्याच्या तयारीत आहे.  बंगलोर, दिल्ली आणि मुंबईतही ही शोरुम असतील.  या ऑफलाईन स्टोअरच्या माध्यमातून HRX ब्रॅड सर्वांपर्यंत पोहचवण्याचा ऋतिकचा प्रयत्न असेल.  

=======

हे देखील वाचा : दिलचस्प किस्सा किशोरच्या ‘दूर गगन की छाव में’च्या रिलीजचा!

=======

बॉलिवूडची बहुधा सर्व स्टार मंडळी अभिनयाव्यतिरिक्त स्वतंत्र असा बिझनेस करीत आहेत. किंग खान शाहरुख खान हा आयपीलमधील कोलकत्ता नाईक रायडर्सचा मालक आहेत. याशिवाय त्याचे स्वतःचे रेड चिली नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे.  शिल्पा शेट्टीही याबाबतीत पुढे आहे.  तिचे शानदार असे हॉटेल असून परदेशातही शिल्पाची गुंतवणूक आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनही बेंगाली किचन नावाच्या अलिशान हॉटेलची मालकीण आहे. शिवाय तंत्र इंटरटेंमेट या कंपनीची मालकी तिच्या नावावर आहे.  सुनील शेट्टी हा अभिनेत फर्निचरच्या व्यवसायात आहे. जॉन अब्राहीमची जा इंटरटेंमेट नावाची कंपनी आहे.  करिश्मा कपूर लहान मुलांच्या कपड्यांच्या व्यवसायात आहे तर, सलमान खानही प्रोडक्शन कंपनीचा मालक असून कपड्यांच्या व्यवसायातही त्याची भागीदारी असल्याची माहिती आहे. अभिनेत्री मलायका अरोरा ही ऑनलाईन कपड्यांच्या व्यवसायात असल्याची माहिती आहे.  या आदीमध्ये आता अक्षय कुमारची (Akshay Kumar) भर पडणार आहे. 

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar bollywood update brand Celebrity Entertainment Featured force ix
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.