
Akshay Khanna : ‘छावा’त औरंगजेब साकारण्यासाठी अक्षयने ठेवली होती अट!
सध्या सर्वत्र केवळ दोनचं चित्रपटांची चर्चा आहे एक म्हणजे सलमान खानचा (Salman Khan) ‘सिकंदर’ आणि दुसरा विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’. थिएटरमध्ये ३० मार्चला ‘सिकंदर’ दहाडण्यासाठी येणार आहे तर विकीचा ‘छावा’ १४ फेब्रुवारीपासून थिएटर चांगलाच गाजवत आहे. दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर ‘छावा’च्या कमाईचा आकडा वाढत आहे. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे लोकांनी कौतुक केलंच पण औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने प्रेक्षकांना अचंबितच केलं. अक्षयने छावा चित्रपटात औरगंजेबाची भूमिका साकारण्यापूर्वी एक अट ठेवली होती जाणून घेऊयात… (Chhaava movie)
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चे लेखक रिशी विरमानी यांनी अक्षय खन्नाची कास्टिंग कशी झाली याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला. ते म्हणाले की, “छावामध्ये औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार, याविषयी चर्चा सुरु असताना अक्षय खन्ना सरांचं नाव सुचवण्यात आलं. अक्षय खन्ना यांना अनेक चित्रपटांमध्ये वेगळ्या भूमिका साकारताना आपण पाहिलंय. त्यामुळे अक्षय खन्ना यांनी ही भूमिका साकारली तर काहीतरी वेगळा परिणाम घडेल. त्यामुळे आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. सरांना भेटल्यावर त्यांना चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली आणि ते ‘छावा’मध्ये काम करायला तयार झाले.” (Bollywood update)

पुढे अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांनी कोणती अट ठेवली याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “अक्षय खन्ना आम्हाला इतकंच म्हणाले या चित्रपटात मला लोकांनी ओळखावं ही माझी इच्छा नाही. औरंगजेब हा औरंगजेबच वाटला पाहिजे. हे ऐकूनच आम्हाला जाणवलं की ते या व्यक्तिरेखेचा किती सखोल अभ्यास करत आहेत. त्यामुळे औरंगजेबाच्या (Aurangajeb) भूमिकेसाठी आमची निवड योग्य आहे, ही खात्री पटली”. (Entertainment news)
===========
हे देखील वाचा : Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…
===========
दरम्यान, ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत अनेक मराठी कलाकार देखील चित्रपटात झळकले होते. संतोष जुवेकर, किरण करमरकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी या कलाकारांनी उत्कृष्ट काम केलं. ‘छावा’ चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या चित्रपटाने ५७८ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ६०० कोटींचा टप्पा गाठेल असं दिसत असलं तरी लवकरच ‘छावा’चा सामना सलमानच्या ‘सिकंदर’ (Sikandar) सोबत होणार आहे. (Box office collection)