‘P.S.I Arjun Marathi Movie मधील प्रमोशनल साँगला ‘Pushapa’फेम नकाश अजीज

Manoj Bajpayee : फॅमेली मॅनमध्ये ‘छावा’तील कलाकार असता श्रीकांत तिवारी
‘सत्या’, ‘घात’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘पिंजर’, ‘जोरम’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी ‘द फॅमेली मॅन’ (The Family Man) या हे सीरीजमध्ये अप्रतिम श्रीकांत तिवारी साकारला. प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका प्रचंड आवडली. इतकंच नाही तर या सीरीजवर बरेच मीम्सदेखील तयार झाले. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की श्रीकांत तिवारी साकारण्यासाठी मेकर्सची पहिलं पसंती मनोज बाजपेयी नव्हते. तर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता श्रीकांत तिवारी असावा अशी इच्छा मेकर्सची होती. जाणून घेऊयात कोण होता तो कलाकार…

तर, ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) या सीरीजमध्ये श्रीकांत तिवारी यांची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) याला ऑफर करण्यात आली होती. मात्र, बजेटमुळे अक्षय खन्नाने ती भूमिका नाकारली होती. या भूमिकेसाठी अक्षय खन्ना यांनी जास्त फी मागितली; मात्र ते समीकरण न जुळल्यामुळे मेकर्सने मनोज बाजपेयी यांना ‘द फॅमिली मॅन’च्या भूमिकेसाठी ऑफर दिली आणि त्यांनी ती स्वीकारली. (Bollywood update)

मनोज आणि अक्षय यांची ओळख तशी फार जुनी आहे. १९९८ मध्ये राम गोपाल वर्मा यांचा ‘सत्या’ (Satya) हा चित्रपट आला होता. ज्यात भिकू म्हात्रे ही भूमिका मनोज बाजपेयीने साकारली होती. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळा ट्रेण्डदेखील सेट केला होता. शिवाय, मनोज यांना या चित्रपटामुळे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
===============================
हे देखील वाचा : मनोज बाजपेयींच्या ‘सत्या’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण, अभिनेत्याने शेअर केल्या जुन्या आठवणी
==============================
त्यावेळी मिळालेलं यश आणि फेम मनोज बाजपेयीला पचवता येत नव्हतं. त्यावेळी Akshay Khanna नेच त्यांना यश आणि फेम कसं टिकवून ठेवावं आणि कधीच इतकं यश आपल्याला न मिळाल्यामुळे त्याचा सामना करत ते कसं पचवावं याबद्दल मार्गदर्शनकेल्याचं एका मुलाखतीत मनोजने सांगितलं होतं. ‘सत्या’ चित्रपटात जे.डी. चक्रवर्ती, उर्मिला मातोंडकर, सौरभ शुक्ला, आदित्य श्रीवास्तव आणि परेश रावल यांच्याही मुख्य भूमिकात आहेत. (Satya movie)
थोडं मनोज यांच्याबद्दल…
मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी १९९४ साली ‘द्रोहकाल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. पण त्यापूर्वी ‘Bandit Queen’ या चित्रपटातही त्यांनी छोटेखानी भूमिका साकारली होती. मनोज बाजपेयी यांना खरी ओळख १९९८ साली आलेल्या ‘सत्या’ या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर ‘शुल’, ‘राजनीती’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ अशा वेगळ्या धाटणीच्या प्रोजेक्ट्सची त्यांनी रांगच लावली. राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटाचा आजही कल्ट फॅन फॉलोईंग आहे. या चित्रपटाने अंडरवर्ल्डचं एक वेगळंच चित्र दाखवलं होतं. ‘सत्या’ (Satya) चित्रपटाने भरघोस यश मिळवत १९९८ साली बॉक्स ऑफिसवर १५ कोटी कमावले होते. (Upcoming Films 2025)