
कोरोनाची लागण झाल्याने अभिनेता अक्षय कुमार अनंत-राधिकाच्या लग्नाला गैरहजर…
एकीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी संपूर्ण बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड स्टार्स सध्या मुंबईत येत आहेत आणि त्याची तयारी करत आहेत. त्याच दरम्यान खिलाडी अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी येत आहे. अक्षय कुमारबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्षय कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. आणि कोरोनामुळे तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापासून दूर राहणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या या लग्नाच्या सर्व फंक्शन्समध्ये ही अक्षय गैरहजर होता. जामनगरमध्ये अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये अक्षय दिसला होता. मात्र, आता तो लग्नाला आणि त्यांच्या कोणत्याही फंक्शनला हजर राहू शकणार नाही.इंग्लिश वेबसाईट इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कोरोनाग्रस्त अभिनेत्याची माहिती त्याच्या टीमकडून देण्यात आली आहे.(Akshay Kumar Corona Positive)

अक्षय कुमारच्या प्रमोशन टीममधील काही क्रू मेंबर्सना कोविड-19 व्हायरसची लागण झाल्याने त्याची तब्येत बिघडली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अक्षय कुमारची ही चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आला. या आधी अक्षय कुमार दोन वेळा कोरोना व्हायरसचा बळी ठरला आहे. अक्षय कुमार 2021 मध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा बळी ठरला होता. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनाही या धोकादायक व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे तो कान्स फिल्म फेस्टिव्हलचा ही भाग होऊ शकला नाही. नुकताच अक्षय कुमारचा सरफिरा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘सरफिरा‘ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर एकापाठोपाठ एक फ्लॉप झाल्यानंतर अक्षय आपला नवा चित्रपट ‘सरफिरा’ घेऊन आला होता. त्याचा हा चित्रपट २०२० मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या साऊथच्या सूरराई पोटरू या चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यात सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत होता. सरफिराला अक्षय कुमारकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिसची स्थिती पाहता अक्षय कुमारला पुन्हा एकदा अयशाला सामोरे जावे लागू शकते, असे दिसते.

अक्षयला कोविड-19 व्हायरसची लागण या बद्दलच्या बातमीने त्याचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. 12 जुलै रोजी अक्षय अंबानी कुटुंबाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार होता, पण आता तो कोरोनामुळे या लग्नाच्या सर्व कार्यक्रमापासून दूर राहणार आहे. अनंत आणि राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग म्हणजेच जामनगरमध्ये अक्षयने हजेरी लावली होती यावेळी तो एकटाच त्यात सामील झाला होता अभिनेत्यासह त्याचे कुटुंबीय दिसले नव्हते.(Akshay Kumar Corona Positive)
================================
हे देखील वाचा: Anant-Radhikaच्या लग्नातील पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मिळणार कोट्यवधींची घड्याळ
=================================
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै ला ‘शुभ विवाह’ झाला. आता 13 जुलैला म्हणजेच आज ‘शुभ आशीर्वाद‘ आणि 14 जुलैला ग्रँड रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. अंबानी यांच्या लग्नाला जॉन सीना, माइक टायसन, जीन क्लॉड व्हॅन डॅम आणि जे शेट्टी, बोरिस जॉन्सन, टोनी ब्लेअर, जॉन केरी आणि स्टीफन हार्पर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित राहीले आहेत.मात्र अक्षयच्या चाहत्यांना त्याला पाहता आले नाही.