महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
Sarfira Box office Collection: अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ने पहिल्या दिवशी कमावले ‘एवढे’ कोटी
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सरफिरा‘ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात अभिनेता एका बिझनेसमॅनची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा प्रेरणादायी आणि मनोरंजक आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित ‘सरफिरा‘ हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तमिळ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सोरारई पोटरु या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याने मुख्य भूमिका साकारली होती. सध्या सरफिराचे फर्स्ट डे कलेक्शन समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सरफिराची बॉक्स ऑफिसवर कमल हासनच्या इंडियन 2 शी टक्कर झाली होती. चला तर मग पाहूया सरफिरा चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर. सेकनिकच्या रिपोर्टनुसार, सरफिराने अक्षयच्या रेस्क्यू ड्रामा मिशन राणीगंजच्या पहिल्या दिवसाच्या कमाई एवढी कमाई केली आहे. चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन निराशाजनक आहे. मात्र, वीकेंडपर्यंत त्यात सुधारणा होईल, अशी निर्मात्यांना आशा आहे.( Sarfira Box office Collection)
या वर्षाच्या सुरुवातीला अक्षय कुमारचा अॅक्शन पट बडे मियां छोटे मियां रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी १५.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. बडे मियां छोटे मियाँ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन काही खास नव्हते आणि तो सिनेमा फ्लॉप ठरला. त्यामुळे सरफिरा हा चित्रपट किती कलेक्शन करू शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शेवटच्या दिवसांच्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह ही आला होता, त्यामुळे त्याला स्वत:ला आयसोलेट करावं लागलं होतं. सेकनिकच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या सरफिराने शुक्रवारी भारतात जवळपास 2.40 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर हळूहळू सायंकाळच्या कार्यक्रमांचे आकडे जरा बर्यापैकी वाढले. मॉर्निंग शोमध्ये 7.03 टक्के, सायंकाळच्या शोमध्ये 13.72 टक्के आणि नाईट शोमध्ये 20.24 टक्के वाढ झाली आहे. विकेंडवर नजर टाकली तर हा आलेख आणखी वर जाऊ शकतो.
‘सरफिरा ‘मध्ये अक्षय कुमारव्यतिरिक्त राधिका मदानही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये अक्षय सामाजिक-आर्थिक अडथळ्यांना आव्हान देणाऱ्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. तो कर्जबाजारी आहे पण त्याला स्वत:हून स्वस्त विमानसेवा सुरू करायची आहे. स्टार्ट अप आणि एव्हिएशन इंडस्ट्रीच्या दुनियेत आधारित ‘सरफिरा’मध्ये परेश रावल आणि सीमा बिस्वास यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमार आणि राधिका मदान स्टारर हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता सूर्याच्या सोरराई पोटरू रिमेक आहे.(Sarfira Box office Collection)
==============================
हे देखील वाचा: ‘कल्की’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची पहिल्याच आठवड्यात १५३ कोटींची कमाई
==============================
गरीब आणि वंचितांसाठी अत्यंत कमी खर्चात विमानसेवा उभारणाऱ्या एका व्यक्तीची कथा हा चित्रपट आहे. सोरराई पोटरू ला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सरफिरा नंतर अक्षय मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे. त्याच्याकडे खेल खेल में, स्काय फोर्स, सिंघम अगेन, जॉली एलएलबी 3, वेलकम टू द जंगल, शंकरा, हेरा फेरी 3 आणि हाऊसफुल 4 सारखे चित्रपट आहेत.