Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Akshaye Khanna ‘छावा’ गाजवल्यानंतर अक्षय खन्नाची साऊथमध्ये एन्ट्री!

 Akshaye Khanna ‘छावा’ गाजवल्यानंतर अक्षय खन्नाची साऊथमध्ये एन्ट्री!
मिक्स मसाला

Akshaye Khanna ‘छावा’ गाजवल्यानंतर अक्षय खन्नाची साऊथमध्ये एन्ट्री!

by रसिका शिंदे-पॉल 07/04/2025

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने थिएटरमध्ये यशस्वीरित्या ५१ दिवसस पुर्ण करत नवा इतिहास रचला आहे. २०२५ या वर्षात विकी कौशल 9Vicky Kaushal) अभिनित ‘छावा’ हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला. इतकंच नाही तर विकी कौशल आणि औरंगजेब ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्या आयुष्यातही ‘छावा’ हा चित्रपट फार महत्वाचा ठरला. या चित्रपटात अक्षयने औरंगजेब साकारल्यानंतर त्यावरुन वादंग निर्माण झाला होता. पण आता बरीच वर्ष काम केल्यानंतर अक्षयने साऊथ इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे. (Akshaye Khanna)

‘हनुमान’ (HanuMan) हा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर प्रशांत वर्मा पहिल्यांदाच फिमेल सुपरहिरो फ्रॅंचायझी असलेला ‘महाकाली’ (Mahakali) हा चित्रपट घेऊन येणार आहे. आणि याच चित्रपटातून अक्षय खन्ना इतर बॉलिवूडच्या कलाकारांपाठोपाठ आपली तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय कारकिर्द सुरु करणार आहे. अद्याप अक्षय खलनायकाच्या की नायकाच्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट करण्यात आले नाही.(Bollywood news)

‘महाकाली’ चित्रपटाबद्दल हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘मुख्य भूमिकेत कोणाला घ्यायचे याबाबत प्रशांत खूप उत्सुक आहे, कारण प्रशांत यांचा हा पहिला महिला सुपरहिरो चित्रपट असेल आणि त्यासाठी एका खास टीमची आवश्यकता आहे. लवकरच इतर तांत्रिक बाबी पुर्ण करुन चित्रपट अधिकृतपणे सुरू होईल. (South Film Industry)

पीव्हीसीयूची (प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स) सुरुवात गेल्या वर्षी ‘हनुमान’ या अभिनेता तेजा सज्जादच्या सुपरहिरो चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाने तेलुगूसह बॉलिवूडलाही भूरळ घातली होती. भगवान हनुमान यांच्या पौराणिक अवताराने प्रेरित झालेल्या पात्रावर आधारित चित्रपटाचं कथानक होतं.(Bollywood tadaka)

‘जय हनुमान’ या नावाने सुपरहिरोंच्या या युनिव्हर्सचा आणखी एक चित्रपट तयार केला जात आहेच. तसेच,या सुपरहिरो फ्रँचायझीला पुढे नेत आता देवी कालीवर आधारित ‘महाकाली’ हा चित्रपट या युनिव्हर्सचा एक भाग असणार आहे. यासोबतच ‘अधिरा’ हा आणखी एक चित्रपट या फ्रॅंचायझीमधला असून त्यात भगवान इंद्रावर आधारित एक पात्र असेल. (Entertainment Masala)

===========================

हे देखील वाचा: Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी मिळाली?
==========================

दरम्यान, जसं अॅनिमल चित्रपटाच्या यशानंतर बॉबी देओलला साऊथ कडून चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. अगदी तसंच काहीसं अक्षय खन्नाच्या बाबतीत झाल आहे. १९९७ मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटापासून त्याच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाल होता. अक्षयचे वडिल विनोद खन्ना सुपरस्टार असल्यामुळे अभिनयाचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं. पण वडिलांच्या ताकदीचा अभिनय अक्षय करु शकला नाही असं म्हटलं गेलं. पण तरीही ‘ताल’, ‘बॉर्डर’, ‘कुदरत’, ‘दिल चाहता है’, ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘दीवार’, ‘आक्रोश’, ‘दृश्यम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Akshaye Khanna films)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity Chhaava Entertainment Laxman Utekar prashant verma telugu films Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.