
Salman Khan याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा आलिया भट्टच्या ‘अल्फा’ला फटका बसणार?
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा नुकताच ६०वा वाढदिवस झाला… त्याच्या फार्महाऊसवर इंडस्ट्रीतील खास लोकांच्या उपस्थितीत सलमानटा वाढदिवस साजरा करण्यात आला… तसेच, दुसरीकडे त्याच्या या खास दिवशी ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle Of Galwan) चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला… २०२५ मध्ये सिकंद चित्रपटानंर सलमान ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात झळकणार असून त्याच्या या चित्रपटाची लोकं आतुरतेने वाट पाहात आहेत… दरम्यान, २०२६ मध्ये ‘बॅटल ऑफ गलवान’ आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार होती, पण यापैकी एका चित्रपटाने आता माघार घेतली आहे…
तर, झालं असं की सलमान खान याचा ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार आहे… विशेष म्हणजे याच दिवशी यशराज फिल्म्समधील पहिला फिमेल स्पाय चित्रपट ‘अल्फा’ (Alpha) देखील रिलीज होणार होता… परंतु, आता आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने सलमानसोबत होणारा क्लॅश मागे घेतला आहे… अल्फा चित्रपट जो आधी १७ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार होता त्याची डेट आता बदलण्यात आली आहे…

दरम्यान, YRF चा ‘अल्फा’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर (Spy Movies Of Bollywood) चित्रपट असून त्यांच्या स्पाय युनिव्हर्सचा हा ७ वा चित्रपट आहे. शिव रावेल यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात आलिया भट्ट ॲक्शन अवतारात दिसणार आहे. तसेच, या चित्रपटात बॉबी देओल (Bobby Deol) आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका असतील असं सांगितलं जात आहे… तरण आदर्श यांच्या रिपोर्टनुसार, ‘अल्फा’ १७ एप्रिल रोजी रिलीज होणार होता.. मात्र, सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’सोबत क्लॅश टाळण्यासाठी ‘अल्फा’च्या मेकर्स रिलीज डेट पुढे ढकलण्याच्या विचारात आहेत… (Bollywood Movies 2026)
================================
हे देखील वाचा : बॉलिवूडचं Spy Universe!
================================
आता बॉलिवूडमधल्या कुठल्याही चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची ही पहिली वेळ नाही.. याआधीही बऱ्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि थिएटर्समध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी माघार घेतली आहेच… याच यादीतला ‘अल्फा’ चित्रपट… खरं तर आधी हा चित्रपट२०२५ मध्येच ख्रिसमसला रिलीज होणार होता. मात्र, व्हीएफएक्सचं काम अपुर्ण राहिल्याने रिलीज डेट पोस्टपोन झाली होती. पण आता सलमानच्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा डेट पुढे जाण्याची शक्यता आहे… (Alia Bhatt Movies)

दरम्यान, सलमान खान याचा ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपट २०२० साली झालेल्या इंडो चायना संघर्षावर आधारित आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चायनामध्ये संघर्ष झाला होता ज्यात भारतीये सैन्याने कोणतंही हत्यार नसताना लाठ्या काठ्यांनी लढाई लढली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत गोविंदा, चित्रांगदा सिंह असे बरेच कलाकार झळकणार आहेत… सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत… (Salman Khan Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi