अलका याज्ञिक आणि पूनम धिल्लाँ यांची पुनर्भेट!
पूनम धिल्लाँ, पद्मिनी कोल्हापुरे आणि गायिका अलका याज्ञिक तिघीजणी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी असून त्या आपल्या या गटाला ‘गर्ल गँग’ असे संबोधतात. या तिघी एकमेकींना नेहमी भेटत असल्या, तरी मध्यंतरीच्या लॉकडाऊनमुळे अलकाजी आणि पूनम धिल्लाँ यांची दीर्घकाळ भेट होऊ शकली नव्हती. झी टीव्हीवरील लिटिल चॅम्पसच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या मंचावर त्या एकमेकींसमोर आल्या. परस्परांना आलिंगन देण्याचा मोह आवरला नाही.
लॉकडाऊननंतर त्या प्रथमच भेटत होत्या त्याप्रमाणे त्यांनी सेल्फी फोटो काढलाच याचबरोबरएकमेकींच्या काही अज्ञात गोष्टी उघड केल्या.
यावेळी पूनम धिल्लाँने अलका यांच्याबाबत एक गोष्ट सांगितली की “त्यांना सर्वजण ‘थकिली’ म्हणायचो; कारण आमच्या भेटीनंतर काही काळाने तिची घरी जाण्यासाठी घाई सुरू होत असे. तिला रात्री फार काळ जागरण करणे जमत नसे.”
याउलट पूनम कोणतीही पार्टी चुकवीत नसे आणि ती तिथे रात्रभर गप्पा मारीत असे. पूनमने आणखी सांगितले की लाजऱ्या स्वभावाची अलका नेहमी ‘राहों में उनसे मुलाकात हो गयी’ हे गाणे गाण्याचे शिताफीने टाळीत असे आणि त्याऐवजी ती नेहमी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गात असे.
तेव्हा अलकाने आपल्या मैत्रिणीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ते गाणे तर गायलेच, पण त्याला कोविड गीत असे नावही दिले. कारण लॉकडाऊननंतर त्यांची ही प्रथमच भेट होती.
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या निमित्ताने आपणही ही धम्माल अनुभवणार आहोत.