ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
आज नजर फक्त आल्यावर…
जगभरातल्या सर्व चित्रपट चाहत्यांची आणि अभिनेत्यांची ज्या पुरस्कारावर नजर लागलेली असते तो ‘ऑस्कर पुरस्कार’ आज जाहीर होत आहे. आणि या सर्वात आपल्या भारतीयांसाठी गौरवाची गोष्ट म्हणजे, या पुरस्कारात यावेळी भारतीय चित्रपटांचा बोलबाला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज, 24 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. अर्थात भारतात तेव्हा सायंकाळचे 7 वाजले असतील. आपल्या सर्वांना हे ऑस्कर पुरस्कार सायंकाळी 7 वाजल्यापासून पहाता येणार आहेत. ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्करच्या (Oscar) यादीमध्ये वरच्या स्थानावर आहे, त्यामुळे भारतीयांचे लक्ष या पुरस्काराकडे लागले असणार हे नक्की. (Oscar)
आज तमाम भारतीयांची नजर ऑस्कर (Oscar) नामांकन यादीवर राहणार आहे. ऑस्कर 2023 च्या नामांकन यादीत स्थान मिळवलेल्या चित्रपटांची नावे जाहीर झाली आहेत. त्यात ‘एसएस राजामौली’ यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटासह अन्यही चित्रपटांचा समावेश आहे. आता या यादीतून नेमकं कोणाकडे ऑस्करची (Oscar) मानाची बाहुली जाणार आहे, त्याचा फैसला काही तासातच होणार आहे. 24 जानेवारी रोजी, ऑस्कर नामांकन कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स थिएटरमधून थेट प्रक्षेपित होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता होणा-या या पुरस्कार सोहळ्यात एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ व्यतिरिक्त गुजराती चित्रपट ‘चेल्लो शो’, ‘ऑल द ऑल दॅट ब्रेथ्स’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटांना ऑस्कर (Oscar) पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
हा ऑस्कर (Oscar) पुरस्कार सोहळा भारतीय प्रेक्षक फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवरही लाईव्ह बघू शकणार आहेत. या ऑस्करच्या (Oscar) यादीमध्ये राजामौलीच्या ‘आरआरआर’ आणि ‘छेल्लो शो’ सारख्या भारतीय चित्रपटांचा समावेश असला तरी त्यांची स्पर्धा बॉक्सऑफीसवर तुफान यश मिळवलेल्या चित्रपटांबरोबर होणार आहे. यात ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ आणि ‘द बनशी ऑफ आय’, ‘शरीन एल्विस’, ‘द फेबल्स मेनेस’, ‘टॉप गन: मॅव्हरिक’ या हॉलिवूडपटांचाही समावेश आहे. ऑस्करसाठी भारतातून ‘चेल्लो शो’ अधिकृतपणे पाठवण्यात आला आहे. याशिवाय ‘ऑल दॅट ब्रीद्स’ हा लघुपट, ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा लघुपटही पाठवण्यात आला आहे.
नलिन दिग्दर्शित, ‘छेलो शो’ ही गुजराती भाषेतील कथा आहे. ही सौराष्ट्रातील एका खेडेगावातील तरुण मुलाच्या प्रेमसंबंधाची कथा आहे. अकादमीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ‘चेलो शो’ हा चित्रपट 14 इतर चित्रपटांशी स्पर्धा करेल. ज्यात ‘अर्जेंटिना, 1985’ (अर्जेंटिना), ‘डिसीजन टू लीव्ह’ (दक्षिण कोरिया), ‘ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ (जर्मनी) यांचा समावेश आहे. ‘राजामौली’ यांच्या ‘आरआरआर’ मधील लोकप्रिय तेलुगू गाणे ‘नातू नातू’ ला तिसरे मोठे आंतरराष्ट्रीय नामांकन मिळाले आहे. ऑस्करमध्ये, ‘नातू नातू’ इतर 14 गाण्यांबरोबर स्पर्धा करणार आहे. ज्यात ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ मधील ‘नथिंग इज लॉस्ट (यू गिव्ह मी स्ट्रेंथ)’, ‘ब्लॅक पँथर: वाकांडा’ मधील ‘लिफ्ट मी अप’ या गाण्यांचा समावेश आहे.
===========
हे देखील वाचा : सामंथा रुथ प्रभूचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शाकुंतलम’चा ट्रेलर रिलीज
===========
आता या सर्व चित्रपट रसिकांची उत्सुकता आणखी ताणली जाणार आहे. अवघ्या काही तासातच ऑस्कर (Oscar) कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे. भारतीय चित्रपटांचा दबदबा वाढत आहे. यावर ऑस्करची मोहोर लागली तर तमाम भारतीयांसाठी तो ‘गौरव दिन’ असेल.
सई बने