Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Allu Arjun : ‘पुष्पा ३’च्या रिलीजला किती वर्ष लागणार?
दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा १’ (Pushpa 1 : The Rise) आणि ‘पुष्पा २’ (Pushpa 2 : The Rule) या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांशी अक्षरश: वेड लावलं. पुष्पाची ड्रेसिंग, डान्सची स्टाईल अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनीच कॉपी केली. ‘पुष्पा २’ चित्रपटाचा शेवट इंटरेस्टटिंग करत ब्लास्टमध्ये पुष्पा आणि त्याच्या कुटुंबाचं काय झालं? आणि तो ब्लास्ट कुणी केला याची उत्तर ‘पुष्पा ३ : द रॅम्पेज’मध्ये मिळणार आहेत. पण नेमका तिसरा भाग कधी येणार याचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे. (Pushpa 3 : The Rampage)
२०२१ साली ‘पुष्पा १ : द राईज’ हा चित्रपट आला आणि त्याच्या ३ वर्षांनंतर ‘पुष्पा २ : द रूल’ प्रदर्शित झाला. दुसरा भाग येण्यासाठी ३ वर्ष लागल्यामुळे ‘पुष्पा ३ : द रॅम्पेज’च्या रिलीजबद्दल निर्माते रविशंकर म्हणाले की, “सध्या अल्लू अर्जुनकडे (Allu Arjun) दोन चित्रपट आहेत. एकाच दिग्दर्शन अॅटली करत आहे तर दुसरा त्रिविक्रम दिग्दर्शित करत आहेत. त्रिविक्रम यांच्या चित्रपटाचं नाव God Of War असं असून यात भगवान कार्तिकेय आणि भगवान शिव याचं नातं कसं होतं हे दाखवलं जाणार आहे. तर ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार राम चरन सोबत नवा चित्रपट करत असल्यामुळे दोघांच्या चित्रपटांचं काम पुर्ण झालं की ‘पुष्पा ३’’ चं काम २०२६ मध्ये सुरु करण्याचा विचार आहे. आणि त्यानंतर २०२८ मध्ये ‘पुष्पा ३’ रिलीज होई शकतो”. (Entertainment update)

अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा १ :द राइज’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल २६७.५५ कोटी रुपये कमावले होते. तर जगभरात चित्रपटाने ३५० कोटींची कमाई केली होती. ‘पुष्पा २: द रुल’ने थेट १२३४.१ कोटींचं नेट कलेक्शन करत जगभरात तब्बल १७४२.१ कोटी कमावले होते. ‘पुष्पा २’ ने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईनंतर आता ‘पुष्पा ३’ चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. (Pushpa 1 and Pushpa 2 box office collection)
===========================
हे देखील वाचा: Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’
===========================
‘पुष्पा १’ आणि ‘पुष्पा २’ मध्ये जितका अल्लू अर्जूनचा अभिनय प्रेक्षकांना आवडला तितकंच कौतुक खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या फहाद फासिल (Fahad Fassil) याची देखील झाली. मात्र, चित्रपटाचे दोन्ही भाग गाजवणारा खलनायक फहाद फासिल तिसऱ्या भागात असेल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण, दुसऱ्या भागात फहादला फारसा वाव न मिळाल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तिसऱ्या भागात खलनायक फहाद असणार की चर्चेत असणारं नाव विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda)असणार याचा उलगडा ‘पुष्पा ३ : द रॅम्पेज’मध्ये होईल. (Tollywood news update)
