Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amir Khan : बॉलिवूडचा तीन खान एकत्र चित्रपटात दिसणार?

मिक्स मसाला

Amir Khan : बॉलिवूडचा तीन खान एकत्र चित्रपटात दिसणार?

by रसिका शिंदे-पॉल 27/03/2025

बॉलिवूड इंडस्ट्री तीन खान्समुळे फार ओळखली जाते. सलमान खान (Salman khan), शाहरुख खान आणि आमिर खान. प्रत्येक खान त्यांचे चित्रपट, वैयक्तिक जीवन यामुळे कायम चर्चेत असतात. सलमान खान आणि आमिर खानने एकत्र काम केलं आहे, शाहरुख आणि सलमानने पण एकत्र काम केलं आहे. पण आत्तापर्यंत तिघांच्याही ३० वर्षांपेक्षा अधिक काळात तीन खान एकत्र दिसले नाहीत आणि आमिर आणि शाहरुखनेही एकत्र स्क्रिन शेअर केली नाही. पण कदाचित लवकरच सलमान, आमिर आणि शाहरुख खान एकत्र चित्रपटात दिसतील यावर स्वत:आमिर खान याने खुलासा केला आहे. काय म्हणाला तो वाचा…  (Bollywood news update)

बॉलिवूडच्या तीन खान्सना एकत्र स्क्रिनवर पाहण्याची प्रक्षकांची फार इच्छा आहे. याबब्दल एका मुलाखतीमध्ये आमिर खान याने भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, मुकेश अंबानीच्या मुलाच्या म्हणजे अनंतच्या लग्नाला मी जाणार नव्हतो. पण अगदी ऐनवेळी मला मुकेश (Mukesh Ambani) यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सलमान आणि शाहरुख एकत्र परफॉर्म करणार आहेत. तर तु देखील त्यात शामिल झालास तर बरं होईल. आणि त्यांची विनंती मी डावलू शकलो नाही आणि तुम्हाला आम्ही अर्ध्या तासात बसवलेले ते स्किट पाहायला मिळालं. (Bollywood news)

===========================

हे देखील वाचा: Amir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट द आमिर खान!

===========================

पुढे तो (Amir Khan)  म्हणाला की, “जेव्हा आम्ही रिहर्सल करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की आम्ही म्हणजे मी सलमान आणि शाहरुख एकमेकांसोबत फार कम्फर्टेबल होतो. आणि त्यामुळेच एकत्र एखादा चित्रपट आम्ही करण्यास काहीच हरकत नाही आहे. सलमानसोबत मी काम केलं आ्हे. पण मी कधीच शाहरुखसोबत काम न केल्यामुळे मला त्याच्यासोबत चित्रपट करायला आवडेल. त्यासाठी फक्त स्क्रिप्ट चांगली असायला पाहिजे. आम्ही तिघांनी याबाबत अनेक वेळा चर्चाही केल्या आहेत. त्यामुळे असा चित्रपट झाला तर आम्हा तिघांनाही खूप आवडेल.” (Entertainment tadaka)

शेवटी आमिर (Amir Khan) म्हणाला की, “आम्हाला आनंदच आहे. आजवर आम्ही कधीच एकत्र काम केले नाही. त्यामुळे आम्हाला काम करताना मजा येईल. चित्रपट चांगला बनेल किंवा वाईट बनेल. मात्र लोकांना देखील चित्रपटात आम्हाला एकत्र पाहायला खूप आवडेल.” त्यामुळे आमिर खानच्या या विधानामुळे भविष्यात तीन खान एकत्र दिसले तर आश्चर्यचकित होण्याचे कारण नाही. (Bollywood update)

तर सलमान खान (Salman Khan) म्हणाला की, “आम्हाला चांगली स्क्रिप्ट मिळाली तरी नक्कीच आम्ही एकत्र चित्रपट करु. पण आत्तापर्यंत आम्हा तिघांना एकत्र चित्रपट कुणीही ऑफर केला नाही. ज्यावेळी आम्ही तिघे एक६ काम करु त्यावेळी ती बिग बजेट फिल्म असेल आणि दिग्दर्शकावर मोठी जबाबदारी असेल. आणि बजेट फार मोठं असल्यामुळे कुणी आमच्यासोबत चित्रपट करेल असं वाटत नाही”. (Salman Khan Sikandar movie)

दरम्यान, आमिर खान आणि सलमान खान यांनी ‘’अंदाज अपना अपना’ चित्रपटात एकत्र काम केलं. तर, शाहरुख आणि सलमानने ‘करण-अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम तुम्हारे है सनम’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.(Bollywood classic movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amir khan Bollywood bollywood movies Entertainment salman khan shah Rukh Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.