“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Waves Summit 2025: “भारतात पुरेसे चित्रपटगृहच नाहीत…” आमिर खानची खंत
१ मे २०२५ पासून मुंबईत वेव्हज समीट २०२५ (Waves Summit 2025) सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या परिषदेत जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आयोजित एका चर्चा सत्रात आमिर खान (Amir Khan) याने भारतात चित्रपटगृहांची संख्या कमी असण्यावरुन खंत व्यक्त केली. तसेच, आगामी काळात भारतीय चित्रपटांसमोर काय आव्हानं आहेत याबद्दलही त्याने भाष्य केलं. (Bollywood news)

आमिर खान म्हणाला का, “भारतीय चित्रपट सृष्टीत जेव्हा कोणताही चित्रपटसुपरहिट होतो तेव्हा त्याचा फुटफॉल काय असतो? जगभरात आपल्या देशाची ओळख सिनेप्रेमी म्हणून होते. दरवर्षी आपल्या देशात सर्वात जास्त सिनेमांची निर्मिती होते. तर आपल्या देशातील केवळ २ टक्के लोक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातात. ९८ टक्के लोक सिनेमावर पैसे खर्च करत नाहीत. मला वाटतं भारतात जास्तीत जास्त थिएटर्स उभारले पाहिजे. देशातील अनेक भागांमध्ये तर थिएटर्सच नाहीत. जोपर्यंत आपण संपू्र्ण देश व्यापणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला सिनेमा पोहोचवणार नाही तोपर्यंत आपण सिनेमालविंग देश होणार नाही. अनेक लोक असते आहेत ज्यांना सिनेमा पाहण्यासाठी जायचं आहे मात्र थिएटर्सच नाहीत.” (Bollywood movies and challenges)
पुढे आपली तुलना इतर देशांशी करत आमिर म्हणाला की, “१.४ बिलियन लोकसंख्या असताना आपल्याकडे केवळ १० हजार थिएटर आहेत. यातही फक्त ९२०० थिटटरमध्ये सिनेमा लागतो. अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं तर त्यांच्याकडे ४० हजार स्क्रीन्स आहेत आणि चीनमध्ये ९० हजार स्क्रीन्स आहेत. याचाच अर्थ आपण समजू शकतो की भारतीय सिनेमाकडे आणखी खूप क्षमता आहे ज्याला आपण एक्स्प्लोर करु शकतो.” (Amir Khan at waves summit)
===============================
हे देखील वाचा: Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….
===============================
दरम्यान, भारतातील पहिल्या जागतिक दर्जाच्या या परिषदेची सुरुवात मुंबईतून झाली असून दरवर्षी मुंबईत वेव्हज समीटचं यापुढे आयोजन केले जाणार आहे. AI संचालित कथाकथन नेक्स्ट-ग्रीन डिजिटल कंटेंट निर्मिती मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा या परिषदेचा मुख्य हेतु आहे. (Waves Summit 2025)