Amir Khan : बॉलिवूडचा तीन खान एकत्र चित्रपटात दिसणार?
बॉलिवूड इंडस्ट्री तीन खान्समुळे फार ओळखली जाते. सलमान खान (Salman khan), शाहरुख खान आणि आमिर खान. प्रत्येक खान त्यांचे चित्रपट, वैयक्तिक जीवन यामुळे कायम चर्चेत असतात. सलमान खान आणि आमिर खानने एकत्र काम केलं आहे, शाहरुख आणि सलमानने पण एकत्र काम केलं आहे. पण आत्तापर्यंत तिघांच्याही ३० वर्षांपेक्षा अधिक काळात तीन खान एकत्र दिसले नाहीत आणि आमिर आणि शाहरुखनेही एकत्र स्क्रिन शेअर केली नाही. पण कदाचित लवकरच सलमान, आमिर आणि शाहरुख खान एकत्र चित्रपटात दिसतील यावर स्वत:आमिर खान याने खुलासा केला आहे. काय म्हणाला तो वाचा… (Bollywood news update)
बॉलिवूडच्या तीन खान्सना एकत्र स्क्रिनवर पाहण्याची प्रक्षकांची फार इच्छा आहे. याबब्दल एका मुलाखतीमध्ये आमिर खान याने भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, मुकेश अंबानीच्या मुलाच्या म्हणजे अनंतच्या लग्नाला मी जाणार नव्हतो. पण अगदी ऐनवेळी मला मुकेश (Mukesh Ambani) यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सलमान आणि शाहरुख एकत्र परफॉर्म करणार आहेत. तर तु देखील त्यात शामिल झालास तर बरं होईल. आणि त्यांची विनंती मी डावलू शकलो नाही आणि तुम्हाला आम्ही अर्ध्या तासात बसवलेले ते स्किट पाहायला मिळालं. (Bollywood news)
===========================
हे देखील वाचा: Amir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट द आमिर खान!
===========================
पुढे तो (Amir Khan) म्हणाला की, “जेव्हा आम्ही रिहर्सल करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की आम्ही म्हणजे मी सलमान आणि शाहरुख एकमेकांसोबत फार कम्फर्टेबल होतो. आणि त्यामुळेच एकत्र एखादा चित्रपट आम्ही करण्यास काहीच हरकत नाही आहे. सलमानसोबत मी काम केलं आ्हे. पण मी कधीच शाहरुखसोबत काम न केल्यामुळे मला त्याच्यासोबत चित्रपट करायला आवडेल. त्यासाठी फक्त स्क्रिप्ट चांगली असायला पाहिजे. आम्ही तिघांनी याबाबत अनेक वेळा चर्चाही केल्या आहेत. त्यामुळे असा चित्रपट झाला तर आम्हा तिघांनाही खूप आवडेल.” (Entertainment tadaka)

शेवटी आमिर (Amir Khan) म्हणाला की, “आम्हाला आनंदच आहे. आजवर आम्ही कधीच एकत्र काम केले नाही. त्यामुळे आम्हाला काम करताना मजा येईल. चित्रपट चांगला बनेल किंवा वाईट बनेल. मात्र लोकांना देखील चित्रपटात आम्हाला एकत्र पाहायला खूप आवडेल.” त्यामुळे आमिर खानच्या या विधानामुळे भविष्यात तीन खान एकत्र दिसले तर आश्चर्यचकित होण्याचे कारण नाही. (Bollywood update)
तर सलमान खान (Salman Khan) म्हणाला की, “आम्हाला चांगली स्क्रिप्ट मिळाली तरी नक्कीच आम्ही एकत्र चित्रपट करु. पण आत्तापर्यंत आम्हा तिघांना एकत्र चित्रपट कुणीही ऑफर केला नाही. ज्यावेळी आम्ही तिघे एक६ काम करु त्यावेळी ती बिग बजेट फिल्म असेल आणि दिग्दर्शकावर मोठी जबाबदारी असेल. आणि बजेट फार मोठं असल्यामुळे कुणी आमच्यासोबत चित्रपट करेल असं वाटत नाही”. (Salman Khan Sikandar movie)

दरम्यान, आमिर खान आणि सलमान खान यांनी ‘’अंदाज अपना अपना’ चित्रपटात एकत्र काम केलं. तर, शाहरुख आणि सलमानने ‘करण-अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम तुम्हारे है सनम’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.(Bollywood classic movies)