Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

Mohanlal : “तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन योग्य सन्मान केला आहे”, बिग बींनी व्यक्त केल्या भावना
मल्याळम सुपरस्टार पद्मश्री मोहनलाल यांना नुकताच दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्कार जाहिर करण्यात आला… ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या मोहनलाल यांना देशभरातील त्यांचे चाहते हा प्रतिष्ठिच पुरस्कार जाहिर झाल्याबदद्ल अभिनंदन करत आहेत… अशातच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील सोशल मीडियावरुन मोहनलाल यांचं अभिनंदन केलं आहे… काय म्हणाले आहेत बि बी? जाणून घेऊयात… (Entertainment news)

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत मोहनलाल (Mohanlal) यांना त्यांच्या कारकीर्दीत मिळालेला हा ‘अत्यंत योग्य सन्मान’ आहे, असं म्हटलं आहे… अमिताभ यांनी लिहिलं आहे की, “मोहनलालजी, तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. हा अत्यंत योग्य सन्मान आहे! खूप खूप अभिनंदन. मी तुमच्या कामाचा आणि अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. तुमच्या अभिनय कौशल्याचं कौतुक तर आहेच शिवाय येत्या काळात अशाच उत्कृष्ट भूमिका आणि कामं तुम्ही करत राहाल आणि आम्हाला प्रेरणा देत राहाल हिच सदिच्छा. मी कायमच तुमचा डाय हार्ड फॅन बनून राहीन.”(Amitabh Bahchcan post on Mohanlal)
================================
हे देखील वाचा : पद्मश्री Mohanlal यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर!
================================
अमिताभ बच्चन आणि मोहनलाल यांनी यापूर्वी ‘कंधार’ (२०१०) आणि ‘राम गोपाल वर्मा की आग’ (२००७) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मोहनलाल यांना २०२३ सालचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. लवकरच मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असणारा दृश्यम ३ हा मल्याळम चित्रपट येणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi