Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ

Amol Palekar : “मी अस्सल मराठी आहे आणि…”; मराठी-हिंदी भाषा वादावर पालेकरांची प्रतिक्रिया!
भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्रेट अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालकेर (Amol Palekar) यांनी आजवर अनेक अजरामर चित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन केले आहेत… गेल्या काही काळापासून दिग्दर्शनापासून दुर असणाऱ्या अमोल पालेकर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात मराठी हिंदी भाषा वादावर आपलं मत ठामपणे मांडलं आहे. दैनिक जागरण या हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात अमोल पालेकर यांनी मी अस्सल मराठी आहे हे मंचावर आवर्जून सांगितलं. नेमकं काय म्हणाले अमोल पालेकर जाणून घेऊयात…(Entertainment)
================================
=================================
तर, अमोल पालेकर यांनी दैनिक जागरण या हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात म्हटलं की, “मला एक गोष्ट सांगायची आहे की हा कार्यक्रम हिंदी ‘दैनिक जागरण’चा आहे त्यामुळे मागे ‘ हिंदी है हम’ हा संदर्भ आहे. मात्र यामागे जर काही राजकारण असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही. मी मराठी आहे, माझी मातृभाषा मराठी आहे. आम्ही दोघंही अस्सल मराठी आहोत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला अनेकांनी मला सुचवलं की अमोल पालेकर हे मराठी नाव तुम्ही हटवा. पण मी कुणाचं ऐकलं नाही. (Bollywood News Update)

पुढे अमोल म्हणाले की, “माझी आत्मकथाही मी आधी मराठीत लिहिली. त्यानंतर त्याचा अनुवाद इंग्रजी आणि हिंदीत केला. हिंदी ही एक सुंदर भाषा आहे. प्रत्येक भाषा जशी सुंदर असते तशीच हिंदी आहे. दरम्यान, अमोल पालेकर यांनी ठणकावून भाषेचं राजकारण केलं तर त्यात सहभाग नसल्याचं केलेलं विधान आणि मराठी भाषेचा केलेला गुणगौरव कौतुकास्पद आहे…
दरम्यान, पुढे अमोल पालेकर यांनी असं देखील म्हटलं की, “महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा प्रयत्न होतो आहे. भाषेचा वाद उफाळून यावा यासाठी हे केलं जातं आहे. मी आणि संध्या (अमोल पालेकर यांची पत्नी) याचा विरोध करतो. आपण गर्वाने म्हणतो की आपण भारतीय आहोत. या भारतात प्रत्येक नागरिकाच्या भाषेचा सन्मान केला जातो”. (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : “Ramayana चित्रपटाचा स्क्रिनप्ले ऐकला आणि मी…” आदिनाथ कोठारे याने सांगितला अनुभव
=================================
अमोल पालेकर यांनी खरं तर हिंदी चित्रपटष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला आहे… ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’, ‘दामाद’, ‘गोलमाल’, ‘जीना यहा’, ‘मेरी बिवी की शादी’, ‘अगर’, ‘चितचोर’, ‘नरम गरम’, ‘जीवन धारा’, ‘गुलमोहर’, ‘अनकहें’ अशा अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे… (Amol Palekar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi