Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य

महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. तिने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील उत्तम काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अमृता नेहमीच अतिशय उत्तम आणि प्रभावी भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असते. लवकरच अमृता एका ऐतिहासिक सिनेमात झळकणार असून, या सिनेमासाठी ती आणि तिचे फॅन्स कमालीचे उत्सुक आहे.

अमृता लवकरच ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या ऐतिहासिक सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती येसूबाईच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकतेच अमृताने तिच्या येसूबाईंच्या वेशभूषेतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे सर्व फोटो सिनेमाच्या सेटवरील दिसत आहे.

अमृता या येसूबाईंच्या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. भरजरी नऊवारी साडी, भरपूर पारंपरिक दागिने, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अशा सुंदर लूकमध्ये ती दिसत आहे.

अतिशय सोज्वळ मात्र तरीही करारी, घरंदाजपणा, सात्विकता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. या लूकमध्ये अमृता खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या सिनेमात संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अनुप सिंग ठाकूर दिसणार आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटातील ‘वाट पाहे शंभूराया’ हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झाले. असून सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. हा भव्य चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करणारा आहे.