‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Amruta Khanvilkar : “माझ्या घरी आलात तर आदर करणं…”; मराठी-हिंदी वादावर चंद्रमुखी काय म्हणाली?
मराठी-हिंदी भाषा वादावर सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली आहेत…आपण ज्या शहरात किंवा राज्यात राहतो तेथील भाषेचा, संस्कृतीचा आदर केला पाहिजे अस ठाम मत कलाकारांनी व्यक्त केलं आहे… आता या मुद्द्यावर अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने आपलं मत मांडलं असून महाराष्ट्रीय लोकं स्वत:हून समोरच्याच्या वाकड्यात जात नाहीत असं स्पष्ट मत तिने व्यक्त केलं आहे… नेमकं काय म्हणाली आहे अमृता जाणून घेऊयात..

तर, नुकत्याच एका कार्यक्रमात तिने मराठी भाषेबद्दल मत व्यक्त केलं आहे…’मला माझ्या ‘मराठी’ भाषेचा अभिमान आहे. याच भाषेनं मला ओळख दिली, काम दिलं’, अशा शब्दांत अमृतानं तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. पुढे अमृता म्हणाली की,’प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते. ती असायलाच हवी. मला माझ्या मातृभाषेचा अभिमान आहे. याच मराठीनं मला ओळख आणि काम दिलं आहे. ज्याप्रमाणे मी माझ्या भाषेचा आदर करते, माझ्या मनात तोच सन्मान इतर भाषांविषयीही आहे. कारण तीसुद्धा कोणाची ना कोणाची मातृभाषाच आहे.
================================
हे देखील वाचा : Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”
=================================
पुढे अमृता असं देखील परखड शब्दांत म्हणाली की, “महाराष्ट्रीय लोकं कधीच स्वतःहून समोरच्याच्या वाकड्यात जात नाहीत. ते खूप शांतताप्रिय असतात. मुंबई नेहमीच सर्वांना सामावून घेते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं इकडे येतात, राहतात, करिअर करतात. महाराष्ट्रानं आपली दारं कायमच सर्वांसाठी उघडी ठेवली आहेत. पण, तुम्ही माझ्या घरी आला असाल, तर माझा आदर करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण एकमेकांचा आदर केल्यावरच ‘संवाद’ घडेल.”
================================
=================================
दरम्यान, अमृतासह रेणुका शहाणे, आशुतोष राणा, शिल्पा शेट्टी, अजय देवगण, सुनील शेट्टी या कलाकारांनी देखील राज्यात सुरु असलेल्या मराठी-हिंदी भाषा वादावर आपली मतं मांडली होती.. एकूणच काय तर आपण जिथं राहतो, तिथली स्थानिक भाषा बोलणं, त्याचा आदर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे, दुसऱ्यांच्या भाषेचा अपमान करणं चुकीचं असल्याचं प्रत्येक कलाकाराचं मत आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi