Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाला संगीत देणाऱ्या पद्मभूषण Ilaiyaraaja यांचा सुरेल प्रवास….
भारतीय संगीतसृष्टीत अमुल्य योगदान देणारं एक महत्वाचं नाव म्हणजे पद्मभूषण इलैयाराजा (Ilaiyaraaja)… सिम्फनीच्या ५ टप्प्यांवर राज्य करुन झाल्यानंतर कर्नाटक संगीताची परंपरा पुढे नेत ‘पंचमुखी’ हा नवा राग इलैयाराजा यांनी निर्माण केला… १५०० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत देणाऱ्या इलैयाराजा यांनी आगामी ‘गोंधळ’ (Gondhal Marathi Movie) या मराठी चित्रपटाला संगीत दिलं आहे… अभिमानाची बाब म्हणजे त्यांना मराठी चित्रपटसृष्टी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विशेष आकर्षण असल्यामुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या मातीतल्या ‘गोंधळ’ या चित्रपटाला संगीत देत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत मोलाचं योगदान दिलं आहे… ७ हजारांपेक्षा अधिक गाणी संगीतबद्ध करणारे आणि जगातील ९वे सर्वोत्कृष्ट संगीतकार असा बहुमान मिळवणारे इलैयाराजा यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेऊयात… (Indian Music Industry)

इलैयाराजा यांच्या जन्म १९४३ मध्ये तमिळनाडूतील एका दलित कुटुंबात झाला… त्यांच्या नावाचीही एक इंटरेस्टिंग कथा आहे.. तर झालं असं की, इलैयाराजा यांचं नाव वडिलांनी राजैया ठेवलं होतं, पण गावातली लोकं त्यांना रासय्या म्हणायची… त्यानंतर ज्यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले ते राजा म्हणायचे… पुढे अन्नकिली हा त्यांच्या आयुष्यातला पहिला चित्रपट त्यांना मिळाला आणि चित्रपटाचे निर्माते पंचू अरुणाचलम यांनी त्यांच्या नावासमोर इलैया असं जोडलं… तमिळमध्ये इलैयाचा अर्थ होतो छोटा आणि इंडस्ट्रीत त्याकाळी एम.एस. राजा हे संगीत दिग्दर्शक होते.. त्यामुळे यांचं नाव इलैयाराजा असं पडलं… (Entertainment News)

लहानपण खेडेगावात गेल्यामुळे गावचं वातावरण आणि लोकसंगीताची त्यांची नाळ जोडली गेली होती… वयाच्या १४व्या वर्षी इलैयाराजा यांनी ग्रामीण लोकसंगीतावर अधिक भर द्यायला सुरुवात केली… पुढे त्यांनी थेट लंडन गाठत तेथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये संगीताचे धडे घेतले… तिथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना उत्कृष्ट वाद्य कामगिरीसाठी सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांनी टी.व्ही. गोपाल यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतलं आहे… उत्कृष्ट संगीतकारासोबतच ते गिटारवादकही आहेत… लंडनहून भारतात आल्यानंतर त्यांनी एका बॅंडसोबत सेशन गिटारिस्ट म्हणून काम केलं… आणि त्यानंतर इलैयाराजा आयुष्यभरासाठी संगीताशी जोडले गेले… इलैयाराजा यांची आणखी एक खासियत म्हणजे लंडनच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑक्रेस्ट्राकडून स्वत:ची सिम्फनी वाजवून घेणारे ते पहिले आशियाई मेस्ट्रो ठरले होते… (Ilaiyaraaja Information)

इलैयाराजा यांनी ८०च्या दशकात तामिळ कवींसोबत त्यांच्या कविवतांसाठी संगीत तयार करण्यास सुरुवात केली.. विविध भाषांच्या संगीताचा कायम अभ्यास करत आणि संगीतरचना करत त्यांनी गुलजार, आर. बाल्की, मणिरत्नम, फाजिल, शंकर नाग यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच, कॉम्प्युटरवरुन गाणे रेकॉर्ड करणारे ते पहिले संगीतकार मानले जातात…आणि भारतीय कंपोझिशनमध्ये वेस्टर्न क्लासिक म्युझिक हार्मनी वापरणारे देखील इलैयाराजा हे पहिले भारतीय संगीतकार आहेत…
================================
हे देखील वाचा : Shah Rukh Khan याने ‘दीवाना’ चित्रपट स्वीकारताना कोणती अट ठेवली होती?
================================
‘सदमा’, ‘कामाग्नी’, ‘शिवा’, ‘और एक प्रेम कहाणी’, ‘हे राम’, ‘चिनी कम’, ‘पा’, ‘शमिताभ’, ‘कि अँड का’ अशा अनेक हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे… दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जरी त्यांनी अधिक चित्रपटांना संगीत दिलं असलं तरी इतर भारतीय भाषांच्या चित्रपटसृष्टीतही त्यांचं अमुल्य योगदान आहे… संगीताचा कुठलीही भाषा नसते हे प्रत्येकाच्या मनात बिंबवणाऱ्या इलैयाराजा यांना अमेरिकन वर्ल्ड सिनेमा पोर्टल ‘टेस्ट ऑफ सिनेमा’द्वारे जगातील २५ सर्वोत्कृष्ट संगीतकारांमध्ये ९ वे स्थान मिळाले. या यादीत समाविष्ट झालेले इलैयाराजा हे पहिले भारतीय संगीतकार आहेत. (South Indian film and Music Industry)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi