‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध गीतकार- कवी यांच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा!
सत्तरच्या दशकामध्ये सुरुवातीला पटकथा आणि संवाद लेखक म्हणून जबरदस्त यश मिळवलेले जावेद अख्तर ऐंशीच्या दशकापासून गीतकार बनले. सत्तरच्या दशकामध्ये ‘सलीम जावेद’ ही जोडी हिंदी सिनेमातील ‘स्टार रायटर’ पेयर होती. सिनेमाच्या धंद्यात लेखकाला सन्मान मिळवून देण्याचे मोठे काम या जोडीने केलं आहे. जावेद अख्तर यांनी १९८१ सालच्या ‘सिलसिला’ या चित्रपटापासून गीत लेखनाला प्रारंभ केला. ऐंशी दशकाच्या मध्यावर सलीम जावेद ही जोडी विभक्त झाली आणि दोघे स्वतंत्र कामे करू लागले.याच काळात जावेद अख्तर गीत लेखनामध्ये रमले आणि अतिशय दर्जेदार गाणी त्यांच्या लेखणीतून उतरू लागले. गीतकार जावेद अख्तर हे जुन्या काळातील गीतकार जानिसार अख्तर यांचे सुपुत्र. साठच्या दशकाच्या आरंभी जावेद मुंबईत आले. त्यांना शायरीची प्रचंड आवड होती. मुंबईत आल्यानंतर ते वडिलांसोबत राहू लागले परंतु काही दिवसातच त्यांचे वडिलांची पटले नाही आणि त्यांनी वेगळे राहायला सुरुवात केली. या काळात त्यांना अतिशय संघर्षाचा सामना करावा लागला. पैशाची चण चण होतीच. काम मिळत नव्हते. शिवाय त्यांना दारू पिण्याचे प्रचंड व्यसन लागले होते. इतके प्रचंड की अक्षरशः वेळ प्रसंगी हातभट्टी, ठर्रा ही दारू देखील ते पीत असत. (Interesting story)
याच काळात पाकिस्तान होऊन ख्यातनाम शायर फैज अहमद फैज भारतात आले होते. जावेद अख्तर फैज यांच्या शायरीचे प्रचंड दिवाने होते. त्यांनी मनोमन ठरवलं फैज यांचा मुशायरा ऐकायला जायचे तसेच त्यांना भेटायचे. हा कार्यक्रम तिकीट लावून होता. जिथे खाण्याचे वांधे होते तिथे तिकिटाचे पैसे कुठून असणार? ज्या दिवशी फैज यांचा मुशायरा होता त्या दिवशी सकाळपासूनच जावेद यांना त्या कार्यक्रमाचे वेध लागले होते.पैशा अभावी कार्यक्रमाला जाता येत नाही याचा त्यांना प्रचंड त्रास होता. संध्याकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे भरपूर मद्य प्राशन केले.दारू पोटात गेल्याने उसने अवसान शरीरात आले. लोकल ट्रेनने विदाऊट तिकीट ते कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. तोवर मुशायरा सुरू झाला होता. कार्यक्रमाला आज सोडणारा डोअर कीपर आता निवांत झाले होते. हीच संधी साधून जावेदने कार्यक्रमाच्या आत प्रवेश केला! आणि थेट स्टेज च्या मागे जाऊन बसला. डोक्यात दारूची धुंदी होतीच हळूच स्टेजवर कोपऱ्यात जाऊन तो बसला. स्टेजवर अनेक शायर आपापली कला सादर करत होते. तिथल्या वातावरणात जावेद अख्तर यांना धुंदी येऊ लागली आणि ते तिथेच ते झोपी गेले! त्यांचे डोळे उघडले. त्या वेळेला मुशायरा संपला होता. फैज आपल्या चाहत्यांच्या गराड्यात होते. तिथून ते त्यांच्या गाडीकडे चालले होते.
जावेदला खूप वाईट वाटले ‘आपण इथे येऊन फैज यांना ऐकले नाही’ ते स्वतःवरच प्रचंड चिडले आणि ताबडतोब फैज यांच्या मागे गेले. अंगात काय उत्साह आला माहित नाही पण तिथल्या गर्दीला बाजूला करत म्हणाले “ फैज साहेबांना काय त्रास देताहात? चला बाजूला सरका!” चाहत्यांना वाटले हा कोणीतरी ऑर्गनायझर पैकी असावा म्हणून ते बाजूला झाले. जावेद ने पुढे होवून गाडीचे दार उघडले आणि फैज साहेबांना आत बसवले आणि स्वतः त्यांच्या शेजारी जाऊन ऐटीत बसला! फैज यांना देखील कळेना ही व्यक्ती कोण आहे? त्यांना देखील वाटले कोणीतरी ऑर्गनायझर असावा. ड्रायव्हरला त्याने इशारा केला ,”आता तू कोणाची वाट पाहतोय? चल ना फैज यांना हॉटेल ला जायचे आहे!” हॉटेल ला पोचल्यावर त्यांच्या रूमची चावी घेतली आणि त्यांच्यासोबत त्याने चक्क रूम मध्ये एन्ट्री केली! तिथे गेल्यानंतर जावेद यांनी आपल्या खास उर्दू जुबानी शैली मध्ये यांचे लक्ष वेधून घेतले. दोघांनी माफक मद्यपान देखील केले. त्यानंतर तिथे सरदार जाफरी देखील आले. तेव्हा जावेद म्हणाले साहेब,” तुम्ही आता गप्पा मारा मी आत जाऊन झोपतो!” आणि बेडरूम मध्ये जाऊन ते झोपून गेले! (Interesting story)
====
हे देखील वाचा : श्रीदेवीची सख्खी जुळी बहिण?
====
दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी त्यांनी डोळे उघडले त्यावेळेला बाहेर त्यांना मोठमोठ्याने आवाज ऐकू येत होते. बाहेरच्या हॉल मध्ये फैज यांची प्रेस कॉन्फरन्स चालू होती. देशभरातील नामवंत पत्रकार फैज साहेबांशी वार्तालाप करत होते. आता जावेद यांची पंचाईत झाली . बाहेर जायचे कसे? त्याच वेळेला फैज यांची पत्नी देखील तिथे आली. हीच संधी घेऊन जावेद थेट फैज यांच्या जवळ गेला त्यांच्याशी हस्तांदोलन केले. आणि म्हणाला ,” अब इजाजत दिजिएगा…!” आणि तिथून अक्षरशः उलट्या पावलाने पळ काढला. दारूच्या नशेमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स जावेद अख्तर मध्ये आला होता आणि हा आत्मविश्वासच त्याला थेट फैज यांच्या सोबत राहण्याचा मौका देऊन गेला. या अनुभवाला फैज यांच्या मुलीने देखील याला दुसरा दिला होता. जावेद अख्तर यांनी देखील हा अनुभव बऱ्याच कार्यक्रमातून सांगितला होता!