Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार

Andaz Apna Apna Re-Release Date: तब्बल 31 वर्षांनंतर सलमान आणि आमीरची जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार !
Andaz Apna Apna Re-Release: बॉलिवूडचे दोन सुपरस्टार आमिर खान आणि सलमान खान काही वर्षांपूर्वी एका कल्ट कॉमेडी चित्रपटासाठी एकत्र आले होते. ‘अंदाज अपना अपना’ असं या चित्रपटाचं नाव होत. याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. पहिल्यांदाच दोघांनी एकत्र येऊन उत्कृष्ट कॉमेडीसिनेमा दिला होता. त्यांनी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट बनवला होता. आता ही जोडी पुन्हा एकदा मनोरंजनासाठी थिएटरमध्ये येत आहे. आमीर आणि सलमानचा ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. (Andaz Apna Apna Re-Release)

31 वर्षांचा आणि प्रचंड लोकप्रिय कॉमेडी चित्रपट अंदाज अपना अपना पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खान आणि आमिर खान पुन्हा एकदा थिएटरमध्ये एकत्र दिसणार आहेत. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुढील महिन्यात एप्रिल २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, निर्माते पैसे कमावण्यासाठी आपले जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचे धोरण अवलंबत आहेत. यात ९० च्या दशकातील चित्रपटांचा तसेच काही नवीन चित्रपटांचा समावेश आहे ज्यांनी सुरुवातीच्या प्रदर्शनानंतरच पैसे कमावले आहेत आणि आता पुन्हा एकदा लाखो रुपये कमावण्यास तयार आहेत.

याच स्ट्रॅटेजी अंतर्गत निर्माते ‘अंदाज अपना अपना’ पुन्हा प्रदर्शित करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘अंदाज अपना अपना’च्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त निर्माते एप्रिल 2025 मध्ये हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. इतकंच नाही तर उद्या या सिनेमाचा लेटेस्ट टीझर रिलीज होणार आहे. त्यानंतर ‘अमर-प्रेम’ची जोडी पुन्हा एकदा थिएटरमध्ये परतणार आहे. सलमान आणि आमीर एकत्र येणार असल्याची बातमी ऐकल्यानंतर चाहते पुन्हा एकदा उत्सुक आहेत.(Andaz Apna Apna Re-Release)
=============================
=============================
निर्माते ‘अंदाज अपना अपना‘ ४ के मध्ये प्रदर्शित करणार आहेत. या चित्रपटात केवळ आमिर आणि सलमानच नाही तर रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल आणि शक्ती कपूर देखील होते. ‘अंदाज अपना अपना’ हा त्याच्या काळातील फ्लॉप चित्रपटांपैकी एक होता, तरीही तो अजूनही कल्ट चित्रपट मानला जातो. त्याच्या सिक्वेलची अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, त्यानंतर आमीर खान आणि सलमान खान यांनी एकत्र काम केलेले नाही. पण प्रेक्षक त्यांच्या पडद्यावर पुनरागमनाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाला पुन्हा एकदा लोकांचे भरभरून प्रेम मिळेल आणि सलमान आणि आमीर एका नव्या चित्रपटासाठी एकत्र काम करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.