‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘आपल्या देशात जे होते तसे कोणत्याच देशात…’ म्हणत प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी मांडले अजानच्या मुद्द्यावर मत
भारत हा नेहमीच सर्वधर्म समभाव असलेल्या देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. आपल्या देशात सर्वच धर्माना समान दर्जा दिला जातो आणि सर्वच धर्मांचा आदर राखला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकरवरील अजानचा मुद्दा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गाजताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरवर अजान लावण्याचा कडाडून विरोध केला होता आणि जिथे असे करण्यात येईल तिथे मोठ्या हनुमान चालीसा लावण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
सोशल मीडियावर, राजकारणाच्या क्षेत्रात, मनोरंजनविश्वात या मुद्द्यावर अनेक मत मांडली जात असून, अनेक कलाकार यावर पुढे येऊन बोलताना देखील दिसत आहे.
आता या विषयावर प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील त्यांचे मत मांडले आहे. अनुराधा यांनी त्यांचे मत मांडताना भारतातल्या अजानची तुलना जगातील अजानशी केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुराधा यांनी त्यांचे याबाबतचे मत मांडले आहे.
====
हे देखील वाचा: आलिशान आयुष्य जगणाऱ्या अल्लू अर्जुनची प्यारवाली लव्हस्टोरी
====
यासंदर्भात बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “मी माझ्या गाण्याच्या आणि कामाच्या निमित्ताने जगातील अनेक देश फिरली आहे. पण आपल्या भारतात जसे होते तसे मी कुठेही घडताना पाहिले नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र आपल्या इथे जबरदस्तीने प्रोत्साहन दिले जात आहे. मशिदींवर लाऊडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांना देखील वाटते की आपणही असे करावे.”
पुढे अनुराधा म्हणाल्या की, “मी अनेक आखाती देशांमध्ये प्रवास केला आहे. पण तिथे लाऊडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लीम देशात लाऊडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होते? जर देशात अजान लावली जात असेल, तर देशातील इतर लोकही अशा प्रकारे हनुमान चालीसा वाजवतील. यामुळे देशात जे वातावरण तयार होईल जे वाद निर्माण होतील ते खूप वाईट असेल.”
पुढे अनुराधा पौडवाल यांनी नवरात्री आणि रामनवमीवर भाष्य करताना सांगितले की, “आपल्या देशातील पुढच्या पिढीला आजच्या मुलांना आपल्या देशाच्या संस्कृतीची ओळख आणि जाणीव करून दिली पाहिजे. आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत, हे त्यांना माहिती पाहिजे याशिवाय हिंदू धर्मामध्ये चार वेद, १८ पुराणे आणि चार मठ आहेत हे देखील सांगितले पाहिजे.”
====
हे देखील वाचा: अभिषेक बच्चन- उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असणारा शांत अभिनेता
====
तत्पूर्वी लाऊडस्पीकरवरील अजानचा मुद्दा आधी देखील खूप गाजला होता. पद्मश्री गायक सोनू निगमने काही वर्षांपूर्वी ट्विट करत सकाळी सकाळी लाऊडस्पीकरवर अजान लावल्यामुळे त्रास होत असल्याचे ट्विट केले होते. या ट्विटमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.