
Anurag Kashyap : कश्यपने ‘या’ कारणामुळे मुंबईला केला कायमचा राम राम!
हिंदी चित्रपटसृष्टीत लोकांना फारच इगो असतात आणि आता बॉलिवूडमध्ये काहीच उरलं नाही असं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले होते. ‘डेव डी’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘बॉम्बे टॉकीज’ असे अनेक सुपरहिट प्रोजेक्ट इंडस्ट्रीला देणाऱ्या कश्यप यांनी बॉलिवूड आता टॉक्सिक झालंय असं म्हणत कायमचा बॉलिवूड इंडस्ट्री आणि मुंबई शहराला राम राम केला आहे. बऱ्याचवेळा कश्यप यांनी हिंदी चित्रपटसृष्टी केवळ बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आता अधिक भर देत असून चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीकडे लक्ष देत नाहीये असं म्हटलं होतं. तसेच, त्यांनी यापूर्वी देखील मुंबई सोडणार असल्याची हिंट दिली होती आणि अखेर आता त्यांनी मुंबई कायमचाच सोडल्याचं जाहिर केलं आहे. (Anurag Kashyap)
Anurag Kashyap यांनी म्हटलं की, “मी मुंबई सोडली आहे. मला फिल्म इंडस्ट्रीतील लोकांपासून दूर राहायचं आहे. इंडस्ट्री खूप टॉक्सिक झाली आहे. प्रत्येकजण अवास्तव लक्ष्याचा पाठलाग करत आहे. प्रत्येकजण ५०० कोटी किंवा ८०० कोटींचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिएटिव्ह वातावरणच उरलेले नाही,” असं अनुराग द हिंदूशी बोलताना म्हणाले. अनुराग यांनी नवीन घराचं भाडं आधीच भरलंय अशी माहिती मिळत असून नेमके ते कुठे स्थायिक झाले आहेत हे त्यांनी उघडपणे सांगितलं नाही. मात्र, गेल्या काही काळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचा वाढलेला वावर पाहता कश्यप बंगळूर येथे राहायला गेले असतील असा अंदाज बांधला जात आहे. (Bollywood industry update)

अनुराग यांनी शहर सोडण्याच्या निर्णयाबद्दल व्यक्त होत म्हटलं की, “खरं तर शहर ही फक्त एक रचना नसते तर तेथील लोक देखील असतात. इथले लोक… ते तुम्हाला खाली खेचतात. शहर सोडण्याचा निर्णय घेणारा मी एकमेव चित्रपट निर्माता नाही, तर अनेक चित्रपट निर्मात्यांनी यापूर्वीच मुंबई सोडली आहे. अनेकजण मध्य पूर्वेला निघून गेले, खासकरून दुबई. तर काही जण पोर्तुगाल, लंडन, जर्मनी, अमेरिका येथे कायमचे निघून गेले आहेत. ज्यांच्याबद्दल मी बोलत आहे, ते सर्व मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते आहेत.” (Entertainment Masala)
पुढे ते म्हणाले की, “मुंबई सोडल्यानंतर आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे आणि त्यामुळे ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असून ताण कमी झाल्यामुळे मी मद्यपान करणंही सोडले आहे,” अशी कबुली त्यांनी दिली. (Trending News)
============
हे देखील वाचा :Salman Khan : ‘सनम तेरी कसम’मध्ये दिसला असता सलमान खान?
============
Anurag Kashyap लवकरच Dacoit या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि अदवी सेश झळकणार आहेत. याशिवाय अनुराग कश्यप Footage हा मल्याळम चित्रपट प्रमोट करत आहेत.