Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा

Manoj Bajpayee आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र; नव्या हॉरर

Rajinikanth यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करणाऱ्या सिनेमात बाजी मारली होती अमिताभ

Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं

Priya Marathe आणि Shantanu Moghe ची साधी पण क्युट लव्हस्टोरी!

Priya Marathe : ‘२ वर्षांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’मध्ये…’ रवींद्र चव्हाण

Famous Studio आता पडद्याआड चालला!

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे लांब!

 Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे लांब!
मिक्स मसाला

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे लांब!

by रसिका शिंदे-पॉल 05/06/2025

अथक परिश्रमानंतर १८ वर्षांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) RCBने IPL मॅच जिंकली. क्रिकेटच्या मैदानात खाली बसून विराटच्या डोळ्यातील आनंदाश्रू सारं काही सांगून गेले. शिवाय दर मॅचप्रमाणे या देखील मॅचनंतर विराटने अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिला मारलेली मिठी जरा स्पेशलच होती. अनुष्का शर्मा हिने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले, विशेष म्हणजे ५०० कोटींच्या क्लबमध्ये तिचे चित्रपट सामिल झाले आणि बॉलिवूडमधल्या तिनही खान्स सोबत तिने स्क्रिन शेअरही केली. मात्र, सध्या अनुष्का चित्रपटांपासून दूर असून पती आणि मुलांसह वैयक्तिक जीवन एन्जॉय करतेय… जाणून घेऊयात अनुष्काच्या प्रवासाबद्दल….(Bollywood actress Anushka sharma)

अनुष्का शर्मा हिचा जन्म अयोध्येत झाला. वडिल आर्मी ऑफिसर असल्यामुळे शिस्तप्रिय वातावरणात अनुष्का लहानाची मोठी झाली. पुढे २००७ मध्ये फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्ससाठी पहिली मॉडेलिंग असाइनमेंट अनुष्काला मिळाली आणि मॉडलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या अनुष्का हिला थेट पहिल्यांदाच यशराज फिल्म्सचा चित्रपट मिळाला. एका मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मा हिने तिच्या पहिल्या ‘रब ने बना दी जोडी’ (२००८) या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली की, “माझ्या घरी एक काचेचं कासव आहे. असं म्हणतात की आपली इच्छा एका कागदात लिहून त्या कासवाखाली ठेवायची आणि ती पुर्ण होते. ज्यावेळी मला माझा पहिला चित्रपट मिळाला त्यावेळी माझ्या आईने मला तिने त्या कासवाखाली ठेवली एक चिठ्ठी दाखवली आणि त्यात तिने चक्क लिहिलं होतं की माझ्या मुलीला पहिला चित्रपट यशराज फिल्म्सचा मिळू दे. आणि तसंच झालं”.(Rab Ne Bana Di Jodi Movie)

================================

हे देखील वाचा: Prajakta Mali : “तिने कशालाच हद्दपार…”, प्राजक्तानं केलं आलिया भट्टचं कौतुक

=================================

तर, ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटानंतर अनुष्काने ‘बॅंड बाजा बारात’ ‘बदमाश कंपनी’, ‘पटियाला हाऊस’, ‘जब तक है जान’, ‘मटरु की बिजली का मन डोला’, ‘पीके’, ‘सुलतान’, ‘दिल धडकनें दो’, ‘सुई धागा’, ‘झिरो’ असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट केले. शिवाय ‘NH10’ चित्रपटात अभिनयासह तिने निर्मात्याचीही जबाबदारी सांभाळली. शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान 9Salman Khan) आणि आमिर खान(9Amir Khan) या तिनही खान्स सोबत काम करणाऱ्या अनुष्का शर्माच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Bollywood)

अल्पावधीतच बॉलीवूडच्या तमाम नव्या-जुन्या ‘ए-लिस्टर’ अभिनेत्यांसोबत काम करून तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील असलेलं हे नाव या फिल्म इंडस्ट्रीत अजूनही नेपोटीझमऐवजी टॅलेंटला प्राधान्य मिळत असल्याची साक्ष देतं. तिने टीव्हीवर झळकण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड करून स्वतःची दुनिया निर्माण केली. सध्या बॉलिवूडपासून अनुष्का शर्मा जरी दूर असली तरी तिची चर्चा मात्र कायम पेज ३ वर आणि सोशल मिडियावर असतेच. (Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anushka and virat kohli Anushka Sharma Bollywood bollywood masala Entertainment News ipl 2025 RCB and virat kohli virat kohli yash raj films
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.