Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ashok Saraf :  “अशोक आणि रंजना बाहेर पडा..”; नाशिकच्या हॉस्पिटलबाहेर आरडाओरडा का झाला होता?

 Ashok Saraf :  “अशोक आणि रंजना बाहेर पडा..”; नाशिकच्या हॉस्पिटलबाहेर आरडाओरडा का झाला होता?
कलाकृती तडका

Ashok Saraf :  “अशोक आणि रंजना बाहेर पडा..”; नाशिकच्या हॉस्पिटलबाहेर आरडाओरडा का झाला होता?

by रसिका शिंदे-पॉल 09/05/2025

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांच्या जोड्या गाजल्या. त्यापैकी एक सदाबहार जोडी म्हणजे अशोक सराफ (Ashok saraf) आणि रंजना देशमुख (Ranjana Deshmukh). अगदी कमी वयात रंजना यांचं अकाली निधन झालं. पण जितकी वर्ष त्यांनी सिनेसृष्टीत काम केलं ते दमदारच केलं. अशोक सराफ आणि रंजना यांनी एकत्र बरेच चित्रपट केले. त्यावेळी दोघांचे चाहते प्रचंड होते; आत्ताही आहेत म्हणा. पण चाहते म्हटलं की आपल्या कलाकाराप्रती भावना व्यक्त करण्याच्या तऱ्हा फारच निराळ्या असतात. असाच काहीसा किस्सा रंजना आणि अशोक सराफ यांच्या दैवत चित्रपटावेळी घडला होता. काय होता तो रंजक किस्सा वाचा… (Marathi films)

तर, अशोक सराफ यांनी रंजना यांच्यासोबतचा हा किस्सा त्यांच्या मी बहुरुपी आत्मचरित्रात सांगितला आहे. त्यावेळी हे दोघं दैवत चित्रपटाच्या शूटिंगसाठ नाशिकला गेले होते. नाशिकच्या एका हॉस्पिटलमध्ये शूटिंग सुरू होताच बाहेर लोकांनी अचानक गर्दी केली. लोकांचा आरडाओरडा सुरु झाला. जमलेली लोकं अगदी बेंबीच्या देठापासून अशोक सराफ आमि रंजना यांना हाका मारत होते. रंजना, अशोक बाहेर या अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. (Ranjana deshmukh’s fan moment)

सुरुवातीला जरा हे वातावरण आणि प्रकरण गंभीर वाटलं. पण नंतर लक्षात आलं की हा संपूर्ण जमाव त्यांच्या लाडक्या अशोक सराफ आणि रंजना यांची एक झलक दिसावी म्हणून हॉस्पिटलजवळ जमा झाला आहे. शेवटी दिग्दर्शकांनी अशोक सराफ आणि रंजना यांना बाहेर आणलं. लोकांनी त्यांना पाहिलं आणि मग तो जमाव शांत झाला.(Nostalagia)

४० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी मनोरंजनसृष्टीला वाहून देणारे अशोक सराफ यांना चाहत्यांचे बरेच अनुभव आले. त्यापैकी आणखी एक किस्सा त्यांनी आत्मचरित्रात लिहिला आहे तो म्हणजे ‘पांडोबा पोरगी फसली’ या चित्रपटाचा. तर या चित्रपटाचा प्रीमियर जेव्हा पुण्याच्या विजय टॉकीजमध्ये झाला, तेव्हा अशोक सराफ यांच्यासाठी बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी जमा झाली होती. अशोक सराफ यांच्या लोकप्रियतेची तेव्हा निर्मात्यांना कल्पना नव्हती; म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी खास गाडीची व्यवस्था देखील केली नव्हती. (Entertainment update)

दैवत चित्रपटासारखाच किस्सा झाला. लोकं अशोक सराफ यांची एक झलक पाहण्यासाठी अक्षरश: वेडे झाले होते. त्यावेळी विलास रकटे या अशोक सराफ यांच्या मित्राने त्यांना थिएटरच्या मागच्या गेटबाहेर रिक्षा आणून त्यांना तिथून बाहेर काढले. पण रिक्षात अशोक सराफ आहेत हे लक्षात आलेल्यावर लोकांनी रिक्षालाही गराडा घातला होता. काही जण तर रिक्षावर चढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर रिक्षावाल्याने कशीतरी तिथून रिक्षा बाहेर काढली आणि अशोक मामा त्या प्रसंगातून बाहेर निघाले. (Marathi films untold stories)

================================

हे देखील वाचा: Ashok Saraf : “तिच्यासोबत माझी चांगली जोडी..”, रंजनाबद्दल पहिल्यांदाच बोलले सराफ!

=================================

अशोक सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर नुकताच त्यांचा आणि वंदना गुप्तेंचा ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपट प्रदर्शित झाला. अशोक सराफ आणि रंजना या जोडीने एकत्रित ‘एक डाव भूताचा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘सासू वरचढ जावई’, ‘अरे संसार संसार’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. (Ashok saraf and Ranjana Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok and ranjana ashok saraf Bollywood Bollywood Chitchat bollywood update celebrity gossips Celebrity News Entertainment Indian Cinema Marathi films ranjana deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.