Instagramवर धुमाकूळ घालणाऱ्या Pretty Little Baby च्या गायिका Connie Francis यांच निधन !

Ashok Saraf : “मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही”; असं का म्हणाले अशोक मामा?
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या अभिनयाचे सगळेच चाहते आहेत… एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका त्यांनी साकारल्या आणि जगभरात आपला चाहता वर्ष निर्माण केला… हिंदीतही उल्लेखनीय कामं करणाऱ्या अशोर सराफ यांनी मात्र एका मुलाखतीमध्ये हिंदीत कायम दुय्यम भूमिका वाट्याला आल्या अशी खंत व्यक्त केली… नेमकी ते काय म्हणाले जाणून घेऊयात…(Entertainment News)

अशोक सराफ यांनी ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘जोरू का गुलाम’, ‘सिंघम’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘गुप्त’, येस बॉस’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली…परंतु, हिंदी चित्रपटात हिरोच्या भूमिकेत ते का दिसले नाहीत, यामागचं कारण त्यांनी अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सराफ म्हणाले की,”मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही. त्यांच्या दृष्टीने हिरो म्हणजे गोरा पान…तो काम काय करतो हे कोणाला माहीत नसतं. आणि कोणाला कळतंही नाही. तसे तर आपण दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हिरोचे रोल कधी मिळणार नाही. मग आपण कॅरेक्टर शोधतो. माझ्यासारख्या किंवा लक्ष्मीकांत सारख्या चेहऱ्याला मग नोकराची भूमिका मिळते. त्याशिवाय काही मिळतच नाही. आता ते करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. जर तुम्हाला ते चांगले पैसे देत असतील आणि जर तुमचा फायदा होत असेल तर काहीच हरकत नाही. पण, लोकं काय म्हणतात यात अर्थ नाही. तिथे आम्ही हिरो म्हणून काम करणं हे होऊच शकत नाही. मग आम्ही कशाला हट्ट धरायचा”.(Bollywood)
दरम्यान, अशोक सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अशी ही बनवाबनवी, आम्ही सातपुते, गंमत जंमत, आयडियाची कल्पना, वेड, नवरा माझा नवसाचा,शेजारी, शेजारी, आमच्यासारखे आम्हीच अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.. लवकरच, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटात ते दिसणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi