Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्सने पूर्ण केले स्टोरीटेलिंगचे गौरवशाली २० वर्ष !

 आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्सने पूर्ण केले स्टोरीटेलिंगचे गौरवशाली २० वर्ष !
Ashutosh Gowariker
Press Release

आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्सने पूर्ण केले स्टोरीटेलिंगचे गौरवशाली २० वर्ष !

by रसिका शिंदे-पॉल 21/12/2024

आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड (AGPPL) ने आज एक उल्लेखनिय बाब साधली आहे. AGPPL ने भारतीय मनोरंजनसृष्टीत दोन दशके पूर्ण केली असून, आज त्यांनी २० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. फिल्मकेकर आशुतोष गोवारीकर आणि त्यांच्या पत्नी सुनीता गोवारीकर यांनी २००४ मध्ये AGPPL ची स्थापना केली होती, आणि याचं पहिले प्रोजेक्ट ‘स्वदेश’ हा चित्रपट होता जो घर आणि मानवतेला समर्पित आहे. या दोन दशकांमध्ये, AGPPL ने अनेक समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरून यशस्वी चित्रपट निर्माण केले आहेत, ज्यामध्ये जोधा अकबर, खेलें हम जी जान से, मोहनजो दाड़ो आणि पानीपत यांचा समावेश आहे. या खास प्रसंगी, AGPPL ने एक विशेष ट्रेलर प्रदर्शित केला, जो त्यांचा २० वर्षाचा यशस्वी प्रवास दाखवतो. या ट्रेलरमध्ये प्रोडक्शन हाऊसच्या ऐतिहासिक चित्रपटांची झलक दाखवण्यात आली आहे ज्यामधून, कला, भव्यता आणि भावना, म्हणजेच एकंदरीत आशुतोष गोवारीकर यांचे सिनेमॅटिक व्हिजन दिसून येते.(Ashutosh Gowariker)

Ashutosh Gowariker
Ashutosh Gowariker

या प्रवासाविषयी व्यक्त होताना आशुतोष गोवारीकर म्हणाले की, “सुनीता आणि मी AGPPL ची सुरुवात एका स्वप्नाने केली होती, की त्याच गोष्टी मांडायच्या ज्या मनाला भिडतील आणि प्रेरित करतील. या कंपनीच्या माध्यमातून मला अनेक प्रतिभावान लोकांना भेटण्याचं आणि त्यांच्याशी सहकार्य करण्याचं भाग्य लाभलं, ज्यामुळे हा प्रवास अद्भुत बनला. २० वर्षांचा हा टप्पा अभिमान आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. हे सर्वकाही कलाकार, टेक्निशियन आणि क्रू सदस्यांच्या योगदानामुळे शक्य झालं आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या माय बाप रसिक प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो.”

Ashutosh Gowariker
Ashutosh Gowariker

AGPPL प्रोडक्शन हाऊस मनोरंजन, शिक्षण आणि प्रेरणा देणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रतिबद्ध आहे.आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्सची पहिली फीचर फिल्म ‘स्वदेश’ (२००४) होती, आणि त्यानंतर आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी आपले स्वतःचे फिल्म प्रोडक्शन हाऊस AGPPL स्थापन केले.(Ashutosh Gowariker)

================================

हे देखील वाचा: स्वप्नीलचा बेधडक डॅशिंग अंदाज…

================================

AGPPL ने नेहमीच आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रवाद, देशभक्ती, धार्मिक सहिष्णुता, जाती व्यवस्था, महिला सशक्तीकरण, मुलींचे संरक्षण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे, ज्याला भारत आजही तोंड देत आहे. AGPPL चित्रपटांना भारतात राष्ट्रीय पुरस्कारांसह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये देखील अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ashutosh Gowariker Ashutosh Gowariker Journy Ashutosh Gowariker Movies Ashutosh Gowariker Production house Bollywood Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.