Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Avatar – Fire and Ash : २१०० कोटींच्या अवतार चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज
कितीही बॉलिवूड, टॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले तरी हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ काही औरच असते… त्यातच जर का चित्रपट जेम्स कॅमरॉन (James Cameron) यांचा असेल तर एक वेगळंच सिनेमॅटिग जग प्रेक्षकांना पाहायला मिळतं… असंच एक आगळ-वेगळं जग जेम्स यांनी ‘अवतार’ (Avatar) या त्यांच्या फ्रेंचायझीमध्ये दाखवलं आहे… ‘अवतार’ आणि ‘अवतार २’ या चित्रपटांच्या यशानंतर आता लवकरच ‘अवतार ३’ (Avatar : Fire and Ash) चित्रपट येणार असून नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज झाला आहे…(Hollywood news)

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आणि सर्वाधिक बजेट असणाऱ्या चित्रपटांपैकी एक असणाऱ्या Avatar- Fire and Ash या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा पेंडोरावर संकट आलेलं दिसत आहे… या तिसऱ्या सिक्वेलमध्ये उत्तम ग्राफिक्स, VFX चा वापर करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा अनुभव प्रेक्षकांना येणार आहे…जेम्स कॅमरॉन यांच्या ‘अवतार ३’च्या ट्रेलरमध्ये पेंडोराचं सुंदर जग दाखवण्यात आलं आहे. जॅक सुली आणि त्याचं अख्खं कुटुंब आपल्या अस्तित्वासाठी लढताना दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये दिसतं की, जॅक सुली आणि त्याचं कुटुंब एकत्र खलनायिका वारंग आणि त्याच्या सैन्याला लढा देताना दिसतात. या भागात पेंडोरामध्ये आगीचा डोंब उसळताना दिसणार आहे… त्यामुळे तिसऱ्या भागाचा ट्रेलरपाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे…(Entertainment News)

================================
हे देखील वाचा: Avatar : Fire and Ash चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहिर!
=================================
दरम्यान, ‘अवतार ३’ चं बजेट २१५६ कोटी असून हा चित्रपट इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे… जगभरात १९ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे… अवतारच्या दोन्ही भागांनी कोटींच्या घरात प्रचंड कमाई केली असल्यामुळे साहजिकच अवतार ३ कडूनही सगळ्यांना अपेक्षा असून बॉक्स ऑफिसवर आता किती कमाई करणार आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे…(Latest Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi