Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ आता 13 वर्षांनंतर प्रदर्शित…

 ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ आता 13 वर्षांनंतर प्रदर्शित…
कलाकृती विशेष

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ आता 13 वर्षांनंतर प्रदर्शित…

by Team KalakrutiMedia 01/12/2022

अवतार हा हॉलिवूडपटाचा सीक्वल, अवतार द वे ऑफ वॉटर आता 13 वर्षांनंतर 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.  भारतासह जगभरात या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.  आश्चर्यचकीत करणारे व्हिज्युअल इफेक्ट्स हे या अवतार चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार(Avatar Release Date) हा चित्रपट भारतीयांसाठी अधिक खास असणार आहे. कारण कॅमेरॉन यांनी अवतारमधील स्पेशल इफेक्टसची कल्पना आणि पांडोरा हे जग भारतीय इतिहासापासून प्रेरणा घेऊन केल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.  अवतारचा हा दुसरा भाग हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. त्याच वेळी, हा चित्रपट 24 तास देशभरातील निवडक सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाचा पहिला शो मध्यरात्री 12 वाजता सुरू होणार आहे. अवतार-द वे ऑफ वॉटरबाबत(Avatar Release Date) भारतीय चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बुकींग चालू केल्यापासून अवघ्या 3 दिवसांत हजारो तिकीटे विकली गेली आहेत. 

पांडोरा या एका अकल्पित जगाला मोठ्या पडद्यावर साकारणारा अवतार चित्रपट 13 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.  हॉलिवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये अवतारचा सहभाग झाला. आता या अवतारचा(Avatar Release Date) दुसरा भाग काढताना जेम्स कॅमेरॉन यांना तेरा वर्ष लागली. जेम्स कॅमेरॉन यांनी अत्यंत गुप्तपणे अवतारच्या दुस-या भागाचे चित्रिकरण केले असून चित्रपटाचा तिसरा भागही जवळपास तयार आहे.

अवतार द वे ऑफ वॉटर (Avatar Release Date) या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झाल्यावरच जगभरात उत्सुकता वाढली होती. सुरुवातीपासूनच या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपटांच्या यादीत अवतार अव्वल स्थानावर राहिला आहे.  या दुस-या भागाची कथा पॅंडोराच्या काल्पनिक जगाभोवती फिरते. पहिल्या भागात शास्त्रज्ञांची एक टीम तिथे राहणाऱ्या आदिवासींच्या रूपात एका माणसाला पाठवते. तो आदिवासी सरदाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि आदिवासींच्या जमिनीत दडलेली मौल्यवान खनिजे काढण्याच्या वैज्ञानिकांच्या कटात सामील होण्यास नकार देतो.  दुस-या भागात या प्रेमी जोडप्याच्या कुटुंबाचा विस्तार झालेला आहे.  पण पुन्हा माणसाचा त्यांच्या जगात हस्तक्षेप होतो, आणि यावेळी आपल्या स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हे पॅंडोरा जोडपे लढाई सुरु करते.  या सर्व कथेदरम्यान अभूतपूर्व सुंदर असे पाण्याखालचे जग दाखवले आहे.  त्याचे स्पेशल इफेक्ट मोठ्या पडद्यावर तेही थ्रीडी मध्ये बघतांना प्रेक्षकांना आपणच त्या जगात वावरत  आहोत असा भास होणार आहे.  

जेम्स कॅमेरॉन यांच्या या चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.  हॉलिवूडसोबतच भारतातील प्रेक्षकही त्यांच्या चित्रपटांची वाट बघत आहेत.  13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग 16 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे आगाऊ बुकींग सुरु झाले असून केवळ 3 दिवसात 45 स्क्रीन्ससाठी चित्रपटाची 15,000 तिकिटे बुक झाली आहेत. त्यावरुनच या चित्रपटाला भारतातही बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.  

दरम्यान सर्व भारतभर अवतारची क्रेझ असली तरी केरळ राज्यात अवतारला(Avatar Release Date) विरोध करण्यात आला आहे.  फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनायझेशन ऑफ केरळ (FEUOK) ने अवतार-2 ला विरोध केला आहे. चित्रपटाचे वितरक आणि थिएटर मालकांमध्ये नफ्यावरुन झालेल्या वादामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

======

हे देखील वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’चा वाद पुन्हा रंगणार

======

अवतार चित्रपटाचा पहिला भाग 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी अवतारने जगभरात एकूण 19 हजार कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.  हा एक विक्रम मानला गेला.  आता अवतारचा दुसरा भाग या विक्रमाला मोडीत काढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.  त्यामुळे केरळमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला नाही तरी भारतातही अन्य राज्यात अवतार(Avatar Release Date) सुपरहिट होईल अशी खात्री आहे.  या चित्रपाटबाबत आणखी एक क्रेझ निर्माण करणारी बातमी म्हणजे,  दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी एका जाहीर मुलाखतीदरम्यान अवतार चित्रपटासाठी हिंदू धर्मातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.  हिंदू धर्मातील पौराणिक कथांपासून प्रेरणा मिळाल्याचे कॅमेरॉन यांनी सांगितले आहे.  68 वर्षीय चित्रपट दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांना भारतीय चित्रपट रसिकांनी भरभरुन यश दिले आहे.  टर्मिनेटर मालिकेतील त्यांचे दोन्ही चित्रपट भारतात कमालीचे यशस्वी ठरले.  त्यांच्या टायटॅनिकलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता या अवतार द वे ऑफ वॉटर च्या माध्यमातून जेम्स कॅमेरॉन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.  या चित्रपटामध्ये पाण्याखाली दाखवलेले आश्चर्यकारक असे जग बघण्यासाठी प्रेक्षक पुन्हापुन्हा थेअटरमध्ये जातील असा विश्वास चित्रपट समिक्षकांनी आधीच व्यक्त केला आहे.  या सर्वांवरुन अवतार बॉक्स ऑफीसवर पहिल्या भागाचा रेकॉर्ड तोडणार हे निश्चित आहे.   

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Entertainment Featured
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.