Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

War 2 आपटल्यानंतर आता अयान मुखर्जीने Dhoom 4 च्या दिग्दर्शनातून घेतली माघार!
बॉलिवूडचं स्पाय युनिवर्स तयार करणाऱ्या यशराज फिल्म्सचा ‘वॉर २’ (War 2) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता… ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एन.टी.आर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘वॉर २’ मात्र बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यात जरा मागेच पडला… ‘वेक अप सिड’, ‘बम्हास्त्र’, ‘ये जवानी है दिवानी’ असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक अयान मुखर्जीने आता ‘धूम ४’ (Dhoom 4) च्या दिग्दर्शनातून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे…

काही मिडिया रिपोर्टनुसार, अयान मुखर्जीने असं म्हटलं आहे की, ‘वॉर २’, ‘धूम ४’ सारखे चित्रपट आपल्यासाठी नाहीत असं त्याल वाटत आहे. रोमान्स, ड्रामा आणि आकर्षक स्टोरीटेलिंग असणारे चित्रपटच मी करु शकतो असं अयान मुखर्जीचं मत पक्क झालं आहे… दरम्यान, ‘वॉर २’ बद्दल बोलायचं तर श्रीधर राघवन यांनी जसं लिखाण केलं होतं तसंच अयानने पडद्यावर साकारलं होतं… स्क्रिप्ट आणि स्क्रीनप्लेमध्ये काहीच हस्तक्षेप न केल्यामुळे कुठेतरी ‘वॉर २’ च्या दिग्दर्शनासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळालं नाही असं जाणवलं… ‘वॉर २’ मध्ये मेकर्सनी साऊथ प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यासाठी ज्युनिअर एनटीआरला (Jr NTR) घेतलं होतं. मात्र त्यांची ही स्ट्रॅटेजी आपटलीच… त्यामुळे action pact चित्रपट अपने बस की बात नहीं असं म्हणत ‘धूम ४’ च्या दिग्दर्शनातून अयान बाहेर पडला आहे… महत्वाचं म्हणजे रणबीर कपूर धूम ४ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून आता आदित्य चोप्राने स्वत:च ‘धूम ४’चं दिग्दर्शन करावं असं वायआरएफ टीमने सुचवलं आहे. (Entertainment News)

‘धूम ४’ च्या मेकिंगमधून अयान मुखर्जी बाहे पडला असून आता तो पुर्णपणे ‘ब्रह्मास्त्र २’कडे लक्ष देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये चित्रपट ऑन फ्लोर येईल असं सांगितलं जात आहे… ‘ब्रह्मास्त्र पार्ट १ शिवा’ (Bramhastra Movie) २०२२ साली रिलीज झाला होता आणि त्याच्याच दुसऱ्या पार्टची सध्या जोरदार तयारी सुरु आहे… चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीर कपूर, आलिया भट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांची भूमिका होती. सिनेमाच्या शेवटी ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’चीही झलक दिसली होती. आता देवच्या भूमिकेत कोण दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तसेच, पार्ट १ मध्ये दीपिका पादुकोणचीही झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे पार्ट २ मध्ये तिची मोठी भूमिका असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi