B. R. Chopra : ‘गुमराह’चा आणि दिलीप कुमारच्या या प्रेम प्रकरणाचा काय संबंध?
लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांच्या ‘गुमराह’ सिनेमाचा आणि Dilip Kumar च्या प्रेम प्रकरणाचा काय संबंध? आहे. १९६३ साली निर्माता दिग्दर्शक B. R. Chopra यांनी एका बोल्ड विषयाला रुपेरी पडद्यावर आणले होते. हा चित्रपट होता ‘गुमराह’ (Gumrah). विवाह बाह्य संबंधावर आधारित या चित्रपटाची कथा त्या काळाच्या मानाने फारच धाडसी अशी होती. या चित्रपटातील नायिका एका गायकाच्या प्रेमात असते पण अचानक परिस्थिती अशी बदलते की तिला आपल्या मोठ्या बहिणीच्या पतीसोबत लग्न करावे लागते. कारण तिची मोठी बहीण अपघातामध्ये मरण पावते.
या बहिणीचे दोन छोटे मुले असतात. त्यांचा सांभाळ कुणी करायचा? यामुळे ती आपल्या मोठ्या बहिणीच्या पतीसोबत लग्न करते. प्रेम की कर्तव्य या प्रश्नाला सामोरे जाताना ती आपल्या प्रेमाची कुर्बानी देते आणि कर्तव्य निभावते. लग्नानंतर हा गायक पुन्हा तिच्या आयुष्यामध्ये येतो. त्यांच्या पुन्हा भेटी गाठी सुरू होतात. अर्धवट राहिलेलं प्रेम पुन्हा रंगू लागतं. पण या प्रेमाला आता चोरटेपणाची आणि अपराधी मनाची किनार असते. (B. R. Chopra)
सिनेमाच्या शेवटी ती नायिका आपल्या भारतीय नारीच्या संस्कृतीच्या मर्यादेला जपत आपल्या पतीकडेच राहते आणि प्रियकराचा त्याग करते! हे कथानक त्या काळाच्या मनाने खूप बोल्ड होते. पण बी आर चोपरा (B. R. Chopra) यांनी खूप संयतपणे हा विषय हाताळला आणि चित्रपट बनवला. नायिकेच्या भूमिकेत माला सिन्हा होती तर प्रियकराच्या भूमिकेत Sunil Dutt. पतीच्या भूमिकेत अशोक कुमार होते. (Bollywood tadka)
निर्माता दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना ही कथेची आयडिया कुठून मिळाली? या बाबत बॉलिवूडमध्ये अनेक वदंता आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता दिलीप कुमार आणि अभिनेत्री Kamini Kaushal यांच्या प्रेमप्रकरणातून या चित्रपटाचे कथा बीज बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांना मिळाले असे म्हणतात. चाळीसच्या दशकाच्या अखेरीस कामिनी कौशल आणि दिलीप कुमार यांची पडद्यावर आणि पडद्या बाहेर चांगलीच मैत्री जमली होती.
नादिया के पार, शहीद, शबनम आणि आरजू हे त्यांचे चार सिनेमे १९४८ ते १९५० च्या दरम्यान आले होते. त्यांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खूप चांगली जमली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते पण दोघांनीही एका क्षणी असे ठरवले की या प्रेमाला काही अर्थ नाही कारण यात कुठली प्रगती होणार नाही त्यामुळे त्यांनी आपल्या प्रेमाला तिथेच पूर्णविराम दिला. (Untold stories)
पुढे कामिनी कौशल आणि दिलीप कुमार चित्रपटात काम करत राहिले पण त्यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केले नाही. कामिनी कौशल यांनी प्रेमात पडण्यापूर्वीच त्या विवाहित होत्या. कामिनी कौशलची एक मोठी बहीण होती तिचा एका अपघातात मृत्यू झाला तिची दोन छोटी मुले होती या मुलांचा सांभाळ आता कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. साहजिकच त्या काळातील प्रथेनुसार कामिनी कौशलचे लग्न तिच्या मोठ्या मेहुण्याची बी एस सूद यांच्याशी लावून देण्यात आले.
यानंतर कामिनी कौशल चित्रपटात काम करत राहिली आणि तिच्या आयुष्यात दिलीप कुमार आले. दिलीप कुमारसोबत कामिनी कौशल यांनी चार चित्रपट केले. चित्रपट करता करता सहाजिकच दोघांची मने जुळली. पण शेवटी परिस्थितीचे भान दोघांनाही होतं आणि तिने स्वतःहून दिलीप कुमारला आपल्या आयुष्यातून दूर केले. आज कामिनी कौशल ९७ वर्षाच्या आहेत. त्यांच्या आयुष्यातील ही हळवी जखम त्यांनी आयुष्यभर सांभाळली आहे! (B. R. Chopra)
आता थोडंसं ‘गुमराह’ या चित्रपटाबद्दल. १८ जानेवारी १९६३ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून या सिनेमाला रसिकांनी अफाट गर्दी केली. या चित्रपटाची सर्व गाणी लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांनी लिहिलेली होती तर संगीत रवी यांचे होते. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातील गाण्यांनी चित्रपट म्युझिकल हिट बनला.
============
हे देखील वाचा : सचिनदा यांनी भांडून ‘या’ गायकाकडूनच गाणे गाऊन घेतले!
============
या चित्रपटाला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक महेंद्र कपूर, सर्वोत्कृष्ट सहनायिका शशिकला, कपूरसंकलक प्राण मेहरा हे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या चित्रपटातील सर्व गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहेत. चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो, आभी जा आभी जा, इन हवाओ मे इन फिजाओं में तुझको मेरा प्यार पुकारे, आप आये तो खयाले दिल ए नाशाद आया… या सिनेमाचा रिमेक २००५ साली ‘बेवफा’ या नावाने आला होता.