SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज; ईशा केसकर नव्या शोमधून करणार पुनरागमन?
Star Pravah वाहिनीने गेल्या काही दिवसांत आपल्या कार्यक्रमांच्या यादीत मोठे बदल करत नवनवीन मालिकांची घोषणा केली आहे. नुकतीच ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ आणि ‘वचन दिले तू मला’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्याचबरोबर १९ जानेवारी २०२६ पासून ‘तुझ्या सोबतीने’ ही नवी मालिका सुरू होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आता स्टार प्रवाहने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या नव्या मालिकेचा पहिलावहिला AI टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीजर शेअर होताच अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, अभिनेत्री ईशा केसकरसाठी खास शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत. प्रोमोनुसार या मालिकेचं नाव ‘बाई तुझा आशीर्वाद’ ( Bai Tujha Ashirwad) असं आहे. (Bai Tujha Ashirwad Serial)

टीजरमध्ये दाखवण्यात आलेली कथा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी आहे. लग्नानंतर एक तरुण आपल्या नववधूला घरी घेऊन येतो. तो आपल्या घराचं मोठ्या अभिमानाने वर्णन करतो. चार भावांचं ते घर असून तिथे कोणतीही स्त्री नाही, असंही तो सांगतो. मात्र प्रत्यक्षात घराची अवस्था फारच बिकट दाखवण्यात आली आहे. सर्वत्र पसारा असलेलं घर पाहून नववधूच्या हातातील हार खाली पडतो, तरीही ती पदर खोचून परिस्थिती स्वीकारण्याची तयारी करत असल्याचं दिसतं. “घराला घरपण बाईमुळेच येतं… येतेय त्यांच्यासोबत तिची गोष्ट” या ओळींनी टीजरचा शेवट होतो.

हा AI टीजर असल्यामुळे मालिकेत कोणते कलाकार झळकणार, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये अनेकांनी या मालिकेत ईशा केसकर मुख्य भूमिकेत असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका संपण्यापूर्वीच ईशाने तिच्या ‘कला’ या पात्राला निरोप दिला होता. त्या निर्णयामुळे तिचे चाहते निराश झाले होते. मात्र आता या नव्या टीजरनंतर पुन्हा एकदा ईशा छोट्या पडद्यावर दिसणार, अशी आशा चाहत्यांना वाटत आहे.(Bai Tujha Ashirwad Serial)
===============================
===============================
सध्या तरी ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका नेमकी कधी सुरू होणार आणि तिच्यासाठी कोणती सध्याची मालिका बंद होणार, याबाबत स्टार प्रवाहकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र AI टीजरमुळे ही मालिका आधीच चर्चेत आली असून, प्रेक्षक तिच्या पुढील अपडेट्सची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.