Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Nilu Phule : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट ‘खलनायक’!

Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Kaun Banega Crorepati 17 PROMO: ‘या’ दिवसापासून अमिताभ बच्चन पुन्हा भेटायला येणार

‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकात Dr. Girish Oak आणि Dr. Shweta

Mumbai Local Movie Teaser: प्रथमेश आणि ज्ञानदाच्या सिनेमाचा कलरफुल टीझर लॉन्च

Amol Palekar : जब दीप जले आना जब शाम ढले

Amitabh Bachchan : १८ वर्षांपूर्वी बॉलिवूडचा Multi Star Cast चित्रपट

Salman Khan लग्न करणार होता पण नेमकी माशी शिंकली कुठे?

Balasaheb Thackeray ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीला म्हणायचे भूत

Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई!

 निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई!
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई!

by गणेश आचवाल 21/10/2020

काही गाणीच अशी असतात की काळ कितीही पुढे गेला तरी त्या गाण्यांची जादू  जरा देखील कमी होत नाही. तुम्हाला ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ हा चित्रपट आठवतो? या चित्रपटाचं नाव काढलं की पहिल्यांदा आपल्या ओठांवर या  चित्रपटातील अंगाई येते. “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही?’

‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटाच्या वेळची गोष्ट आहे.

चित्रपटाचे सर्व शूटिंग झाले होते. फक्त एका गाण्याचे शूटिंग बाकी होते आणि ते गीत अभिनेत्री आशा काळे -नाईक यांच्यावर चित्रित होणार होते. पण त्यावेळी आशा काळे यांची तब्बेत बरी नव्हती. रुग्णालयातून त्या घरी येऊन नुकत्याच घरी आल्या होत्या. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की नाटकात आणि चित्रपटात सध्या काम करू नका.

एकाच गाण्याचे शूटिंग राहिले आहे, ते आपण करूया का, असे दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी विचारले . पण आशा काळे  यांच्या आईने नकार दिला. तोरणे साहेब म्हणाले की सर्व चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. फेमस स्टुडिओत सेट उभारला आहे आणि तो सेट आता काढावा लागणार आहे. त्यामुळे तिथे त्या गाण्याचे शूटिंग होणे आवश्यक आहे. आशा काळे यांनी होकार दिला.

हे वाचलेत का ? रात्रीस खेळ चाले…

ती अंगाई होती,”निंबोणीच्या झाडामागे” आणि त्यात अर्थातच एक बाळ त्यांच्यासमवेत असणार होते. लहान मुल ते, साहजिकच मध्येच ते केस ओढणार, गळ्यातील साखळीशी खेळणार हे स्वाभाविक होते . अखेर त्या अंगाईचे चित्रण झाले. गीतकार मधुसूदन कालेलकर यांना आशा काळे म्हणाल्या,” या चित्रपटात ‘धुंदीत गाऊ’ हे प्रेमगीत आहे आणि त्यासाठी तुम्ही चक्क काश्मीरला जाऊन चित्रण केलंत आणि मला मात्र या स्टुडिओत हे गीत दिलंत.”

त्यावर कालेलकर म्हणाले, “आशा, हे गीत म्हणजे अंगाई आहे आणि ही अजरामर होणार आणि या गीतामुळे तू कायम लक्षात राहशील.”

कालेलकरांचे हे शब्द खरे ठरले. आजही जेव्हा एखाद्या समारंभाला त्या जातात, तेव्हा या गाण्याबद्दल त्यांना प्रतिक्रिया मिळते. एकदा त्या एका लग्नाला गेल्या होत्या. एका बाईंच्या कडेवर एक मूल होतं आणि ते सारखे आशा काळे यांच्याकडे पाहत होते.

आशाताईंना त्या मुलाच्या आईने सांगितले की अहो आशाताई, तुम्हाला आमचं बाळ ओळखतं कारण रोज रात्री आम्ही ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ मधील तुमचे गीत आम्ही आमच्या बाळाला मोबाईलवर दाखवतो. ” ही प्रतिक्रिया ऐकल्यावर आशाताई यांना खूप भरून आलं. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेली सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही अंगाई अजरामर झाली. या अंगाईला संगीतकार ‘एन. दत्ता’ यांनी संगीत दिले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment Marathi Movie Marathi songs Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.