Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत ‘या’ सर्व कलाकारांना केली मदत

 Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत ‘या’ सर्व कलाकारांना केली मदत
कलाकृती विशेष

Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत ‘या’ सर्व कलाकारांना केली मदत

by Jyotsna Kulkarni 23/01/2025

आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची ९९ वी जयंती. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या राजकारणातील एक धगधगते पर्व होते. बाळासाहेबांच्या नुसत्या नावानेच प्रत्येक व्यक्तीला घाम फुटायचा. त्यांचा आवाज, त्यांचा दरारा, त्यांची धाक एकूणच साहेबांचे व्यक्तिमत्वच असे होते की, प्रत्येक जणं त्यांना घाबरूनच असायचे. आज बाळासाहेब जाऊन बरीच वर्ष झाली, मात्र अजूनही एकही दिवस त्यांची आठवण कोणत्याही मराठी माणसाला आल्याशिवाय होत नाही. त्यांनी आयुष्यात कोणतेही मोठे पद भूषवले नाही, मात्र तरीही त्यांच्यात तेवढी ताकद होती की ते कोणतेही काम करून दाखवायचे. त्यांचे नावच कोणतेही काम करण्यासाठी पुरेसे होते. (Balasaheb Thackeray)

बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी खूप मोठे काम केले. महाराष्ट्रात मराठी माणूस टिकावा, मराठी भाषा टिकावी यासाठी ते कायम झटले. सर्व सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच गरजू लोकांच्या मदतीसाठी बाळासाहेब सदैव पुढे असायचे. त्यांनी कधीही कलाकार आणि सामान्य जनता यांच्यामध्ये फरक केला नाही. आज बाळासाहेबांची जयंती आहे. त्याच निमित्ताने आपण त्यांचे मनोरंजनविश्वातील काही गाजलेले किस्से जाणून घेऊया. (Entertainment mix masala)

बाळासाहेबांनी संजय दत्तला (Sanjay Dutt) तुरुंगातून बाहेर काढले होते. हे तर सगळ्यांनाच माहित आहे. १२ मार्च १९९३ साली मुंबईत १२ बॉम्ब ब्लास्ट झाले. बॉम्बस्फोटात अनेक लोकांनी आपला जीव गमावला तर हजारो लोकं जखमी झाले. या स्फोटानंतर संजय दत्तच्या घरी अवैध शस्त्र सापडली होती. त्यामुळे ‘टाडा’ कायद्याखाली संजय दत्तला अटक होऊन, १९९५ ला संजय दत्तची रवानगी जेलमध्ये झाली. (Bollywood Masala)

Balasaheb Thackeray

संजय दत्तच्या सुटकेसाठी त्याचे वडील सुनील दत्त (Sunil Dutt) आटोकाट प्रयत्न केले. ते स्वतः काँग्रेस पक्षामध्ये होते. मात्र त्यांना यश मिळत नव्हते अखेर त्यांनी संजूबाबाच्या सुटकेसाठी अखेर बाळासाहेब ठाकरेंना साद घातली. संजय दत्त जेलमध्ये गेला त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं युती सरकार सत्तेत होतं. त्यावेळ बाळासाहेबांनी चक्रं फिरवली आणि तब्बल १८ महिने तुरुंगवास भोगून संजय दत्त बाहेर आला होता. (Sanjay Dutt And Balasaheb Thackeray)

बाळासाहेबांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना देखील मदत केली आहे. ही मदत इतकी मोठी आणि महत्वाची होती की याच मदतीमुळे आज अमिताभ बच्चन जिवंत आहे. खुद्द अनेकदा अमिताभ यांनी देखील याबद्दल सांगितले आहे. ‘कुली‘ (Coolie) चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ यांना अपघात झाला होता. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळं कोणतीही रुग्णवाहिका त्यांना मुंबईला सोडायला तयार नव्हती. त्यावेळी शिवसेनेच्या एका रुग्णवाहिकेतून ते मुंबईला पोहोचले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर वेळेत उपचार सुरु झाले आणि त्यांचा जीव वाचला. (Ankahi Baatein)

Balasaheb Thackeray

एका मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदा मातोश्रीवर गेल्यावर काय अनुभव आला हे देखील सांगितले होते. ते म्हणाले की, “जया आणि माझे लग्न झाले तेव्हा बाळासाहेबांनी मला बोलावले होते. मी त्यांना भेटायला गेलो, मी त्यांच्या घरी गेलो आणि माईंनी जयाचे त्यांच्या घरी असे स्वागत केले की, जणू त्यांचीच सून घरी आली होती. तेव्हापासून ठाकरे कुटुंबाशी आमचे कौटुंबिक नाते तयार झाले ते आजपर्यंत कायम आहे.” (Amitabh Bachachan and Balasaheb Thackery)

काही महिन्यांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रवींद्र महाजनी यांची पत्नी असलेल्या माधवी महाजनी यांनी त्यांचे ‘चौथा अंक’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी कशी मदत केली याबद्दल लिहिले आहे. (Madhavi Mahajani )

माधवी वानखेडे स्टेडिअममध्ये मी मेन्टेनन्सचे काम करायच्या. त्यांच्या हाताखाली आठ मुले कामाला होती. स्वच्छता, स्टॉक बघणे ही कामे माधवी बघायच्या. तिथल्या एकूण स्टाफपैकी माधवी एकट्याच पदवीधर होत्या. पण त्यातून तिथल्या काही मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल आकस निर्माण झाला. म्हणून त्या मुलांनी माधवी यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या नावासमोर लेटमार्क केले जाऊ लागले.

Balasaheb Thackeray

एकदा माधवी ऑफिसमधून घरी आल्या तेव्हा त्यांचे पती रवींद्र महाजनी यांची मुलाखत घेण्यासाठी कोणीतरी पत्रकार बाहेर बसले होते होता. माधवी यांनी रागात रवींद्र यांना सांगितले की, ”सगळं काम मी नीट करत असतानाही माझे रेकॉर्ड कुणीतरी खराब करत होतं” हे बोलणे पत्रकारांनी ऐकले आणि त्यांनी परस्पर थेट बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नीला म्हणजेच मीनाताई ठाकरे यांना फोन केला. आणि दुसऱ्या दिवशी भेटायची वेळ घेतली. माधवी यांना याबद्दल समजल्यावर त्यांना एवढ्या छोट्या कामासाठी त्रास देणे योग्य वाटले नाही मात्र वेळ घेतल्याने त्या मातोश्रीवर पोहचल्या.

==========

हे देखील वाचा : Rashmika Mandanna महाराणी येसूबाईंच्या अवतारातील रश्मिका मंदानाचे ‘छावा’ सिनेमातील फोटो व्हायरल

Akshaye Khanna छावा सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखले का?

==========

माधवी त्यांच्या घरी गेल्या तेव्हा बाळासाहेबांनी त्यावेळचा त्यांचा युनियन लीडर मोरेला मातोश्रीवर बोलावले होते. तो आला तेव्हा खूप घाबरलेला होता, घाम पुसतच तो आला होता. बाळासाहेबांनी त्याला सांगितले की, . ‘या कोण आहेत माहिती आहे का? यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा’, यानंतर त्यांना कोणीही ऑफिसमध्ये त्रास दिला नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bacchan Amitabh Bacchan social media Balasaheb Thackeray Balasaheb Thackeray and bollywood Balasaheb Thackeray and entertainment world Balasaheb Thackeray birth anniversary Balasaheb Thackeray facts madhavi mahajani sanjay dutt बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि कलाकार बाळासाहेब ठाकरे किस्से बाळासाहेब ठाकरे जयंती मनोरंजनविश्व आणि बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.