Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Bharat Jadhav यांचा चित्रपट आता थांबत नाही राव; १ महिना उलटुनही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद!
२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या ‘रेड २’ सोबत भरत जाधव (Bharat Jadhav) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आता थांबायचं नाय’ (Aata Tahmbayach nay) चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता १ महिना उलटुन गेला असूनही थिएटरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवत आहे. जाणून घेऊयात आत्तापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला. (Entertainment News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाने, पहिल्या दिवशी ४५ लाख, दुसऱ्या दिवशी १४ लाख, तिसऱ्या दिवशी १७ लाख, चौथ्या दिवशी ४ लाख, पाचव्या दिवशी १६ लाख, सहाव्या १२ लाख, सातव्या दिवशी १३ लाख, आठव्या दिवशी १६ लाख, नवव्या दिवशी १४ लाख, दहाव्या दिवशी ३८ लाख, अकराव्या दिवशी ६९ लाख, बाराव्या दिवशी २ लाख, तेराव्या दिवशी २२ लाख, चौदाव्या दिवशी १७ लाख, पंधराव्या दिवशी १८ लाख, सोळाव्या १६ लाख, सतराव्या दिवशी ३ लाख, अठराव्या दिवशी ४५ लाख, एकोणिसाव्या दिवशी १७ लाख, विसाव्या दिवशी १६ लाख, एकविसाव्या दिवशी १३ लाख, बाविसाव्या दिवशी १४ लाख, तेविसाव्या दिवशी ८ लाख, चोविसाव्या दिवशी १२ लाख, पंचविसाव्या दिवशी १६ लाख, सव्विसाव्या दिवशी १ लाख, सत्ताविसाव्या दिवशी ६ लाख, अठ्ठाविसाव्या दिवशी ८ लाख, एकोणतीसाव्या दिवशी ८ कोटी, तिसाव्या दिवशी ७ लाख, एकतिसाव्या दिवशी ९ लाख, बत्तीसाव्या दिवशी १२ लाख, तेहत्तीसाव्या दिवशी ६ लाख, चौतीसाव्या दिवशी ६ लाख, पस्तीसाव्या दिवशी ५ लाख कमवत आत्तापर्यंत चित्रपटाने ६.३४ कोटींची कमाई केली आहे. (Aata Thambayach Naay movie box office collection)
================================
हे देखील वाचा: Housefull चित्रपटाच्या फ्रेंचायझीने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर कमावले ७९० कोटी!
=================================
‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचळ यांची केलं असून यात मुंबईतील सफाई कामगाराचं जीवन मांडण्यात आलं आहे. चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर अशा अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Aata Thambayach Naay movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News