Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला

राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर

Kapil Sharma याच्या कॅनडातील Kaps Cafe वर गोळीबार, खलिस्तानी दहशतवाद्याने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

भाऊबळी: वर्गीय लढ्याची प्रासंगिक गोष्ट

 भाऊबळी: वर्गीय लढ्याची प्रासंगिक गोष्ट
बॉक्स ऑफिस

भाऊबळी: वर्गीय लढ्याची प्रासंगिक गोष्ट

by Team KalakrutiMedia 17/09/2022

‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा कथासंग्रह नक्कीच तुम्ही वाचला असेल किंवा त्याविषयी ऐकले तरी असेल. समीक्षक, पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचं लेखन हे समाजातील दुर्लक्षित घटकांवर भाष्य करणारे होते. त्यांच्या लेखनातील दाहकता अनेकदा बोचणारी होती, तर पिडीतांना पांघरुणात घेणारी होती. अशा या लेखकाच्या कथेवर त्याच्या पश्चात सिनेमा होताना नक्कीच अनेक प्रश्न तुम्हा आम्हाला पडलेले असणार; ती व्यक्ती आज आपल्यात असती तर? असा सवाल नक्कीच तुमच्या मनात आला असेल. पण, त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये हा त्यांच्या कथानकावर आधारित सिनेमा घडला आहे. त्यांनीच अर्थात जयंत पवार यांनीच या सिनेमांची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्यामुळे या कलाकृतीकडे आपण निरखून पाहण्यास बांधील आहोत. (Bhau bali Marathi Movie Review)

ज्यांनी यापूर्वी हे पुस्तक किंवा ही कथा वाचली आहे; त्यांना तो व्यवस्थेवर भिरकावलेला ‘दगड’ आठवत असेल. तसाच दगड नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ सिनेमात जब्याने देखील व्यवस्थेवर भिरकावला होता. तोच ‘दगड’ पुन्हा एकदा आपल्यावर (समाजावर) भिरकावलेला ‘भाऊबळी’मध्ये दिसतो.  

सोपारवाडीची.. मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची गोष्ट प्रासंगिक विनोद शैलीने ‘भाऊबळी’मध्ये लेखक, दिग्दर्शकाने मांडली आहे. हा सिनेमा प्रथमदर्शी व्यक्तिकेंद्री दिसतो. पण, तो तसा नसून समूहकेंद्री अधिक आहे. 

सिनेमांच्या नावावरून सांगायचं झालं तर ‘भाऊ’ आणि ‘बळी’ या दोन व्यक्तींमधील, घटकांमधील, समाजामधील किंबहुना वर्गातील ही संघर्षकथा आहे. फ्लॅटमध्ये रहाणारे भाऊ आवळस्कर (मनोज जोशी) हे कनिष्ठ वर्गासमोर आपल्या मध्यमवगीर्य गंडाचा माज दाखवणार्‍या लोकांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. आपले दुधाचे पैसे बुडवणार्‍या आवळस्करांना कसं नामोहरम करायचं या विचारानं अस्वस्थ असलेल्या जिजाबाईनगरमध्ये (कामगार वस्ती) रहाणार्‍या बळी जंगमला जेव्हा आपल्या मुलानं आवळस्करांच्या मुलीशी लग्न केल्याचं कळतं तेव्हा काव्यात्म न्याय मिळाल्याचं समाधान त्याला मिळतं. आपल्याला तुच्छ लेखणार्‍या आवळस्करांच्या मुलीच्या पोटात आता खालच्या वर्गातील मुलाच्या वंशाचा दिवा वाढणार या कल्पनेनं खूश झालेला बळी जंगम समाजवृत्ती दर्शवतो.  

उच्चवर्ग आणि कनिष्ठ वर्गातला वर्गसंघर्ष सिनेमात प्रकर्षाने दिसतो. लेखनाच्या पातळीवर सिनेमा उजवा आणि भक्कम आहे. पण, पटकथेत सिनेमा काही ठिकाणी रेंगाळतो. परिणामी सिनेमांची प्रेक्षकांवरील पकड उत्तरार्धात निसटते. सिनेमांचे एक बलस्थान म्हणजे; सिनेमा काही मुद्दे ‘अंडर प्ले’ होऊन सुचवू पाहतो. स्वत:ला सहिष्णू म्हणवणारा पांढरपेशा वर्ग मानभावीपणे आपण सर्व पातळ्यांवरच्या समानतेसाठी आग्रही आहोत असं भासवत असला तरी आजही जातीय, वगीर्य विषमता मनात बाळगून आहे. त्याच्या ह्या ढोंगी, मानभावी मानसिकतेवर ‘भाऊबळी’ नेमकं बोट ठेवतो. 

सिनेमात दिग्दर्शकाने काही प्रसंगांमध्ये केलेले स्वप्नरंजन खटकवणरे आहे. सिनेमाची पटकथा पूर्णतः वास्तवाशी धरुन असती, तर कदाचित सिनेमाचा प्रभाव अधिक गडदपणे प्रेक्षकांवर पडू शकला असता, असा विचारही सिनेमा पाहताना डोक्यात येतो. दिग्दर्शकाने त्याची गोष्ट त्याच्या पद्धतीनं पडद्यावर मांडली आहे; त्यामुळे तो दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे, हे नाकारता येणार नाही.  

सिनेमात दाखवण्यात आलेले सत्यस्थितीचे हे चित्रण समाजाला आरसा दाखवणरे नक्कीच आहे. अभिनयाच्या पातळीवर सर्व कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. मनोज जोशी आणि किशोर कदम यांनी आपापल्या भूमिका लीलया निभावल्या आहे. सोबतच मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी आणि संतोष पवार यांची कामं विशेष अधोरेखित होतात. त्यांची संवादशैली चेहऱ्यावर हसू आणणारी आहे. बाकी सिनेमा तांत्रिकदृष्टया चांगला झाला आहे. सिनेमा जे सांगू पाहतोय ते आपल्यापर्यंत पोहोचते, पण सिनेमाला मूळ पुस्तकातील कथानकाची दाहकता आलेली नाही. बाकी सिनेमा जरुर पाहण्याजोगा आणि मनोरंजक आहे.

सिनेमा : भाऊबळी

निर्मिती : नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगांवकर

दिग्दर्शन : समीर पाटील

लेखन : जयंत पवार

कलाकार : मनोज जोशी, मेधा मांजरेकर, किशोर कदम, रसिका आगाशे, राजन भिसे, विजय केंकरे

छायांकन : सुहास गुजराती

संकलन : किरण क्षीरसागर

दर्जा: २.५ स्टार

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bhau bali Bhau bali Movie Review Entertainment Featured Marathi Movie Marathi Movie Review Movie Review
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.