Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

Bhool Bhulaiyaa 3 Teaser: पून्हा आली मंजुलिका,’भूल भुलैया ३’ चा धमाकेदार टीजर आला समोर
‘भूल भुलैया ३‘ हा सिनेमा यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली होती. पण आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन टीझर रिलीज केला आहे, जो 1 मिनिट 46 सेकंदाचा आहे. सिनेमाच्या टीजर मध्ये कार्तिक आर्यन आणि मंजुलिकाच्या लूकमध्ये विद्या बालन दिसत आहे. हा टीजर पाहून दिवाळीला हा सिनेमा धमाल मनोरंजन करेल असा विश्वास चाहत्यांना आहे. तर काही चाहते मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालनच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.(Bhool Bhulaiyaa 3 Teaser)

अनीस बज्मी दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गेल्या दोन वेळा हिट ठरलेल्या या चित्रपटाकडून यंदाही चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आणि नवा टीझर भन्नाट आहे. टीझर पाहून मजा येते आणि थोडी भीतीही वाटते. यात विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या रुपात परतली असून तिचे सिंहासन घेण्यासाठी ती आली आहे असे दाखवण्यात आले आहे.

टीझरच्या सुरुवातीला कार्तिक आर्यनचा आवाज ऐकू येतो, कोण म्हणतो, काय झालं कथा संपली? दरवाजे बंद केले जातात जेणेकरून एक दिवस ते पुन्हा उघडू शकतील. नंतर विद्या बालन पुढे मंजुलिकाच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे, जी एका हाताने सिंहासन उचलताना दिसत आहे. जग मूर्ख आहे आणि गोष्टींना घाबरतो असं म्हणणाऱ्या रुह बाबाच्या अवतारात तुम्ही कार्तिकला पाहू शकणार आहात.(Bhool Bhulaiyaa 3 Teaser)
================================
================================
विद्या बालन ‘भूल भुलैया ३’ मध्ये मंजुलिकाची भूमिका साकारत आहे. तर कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रूह बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याचा भूतांवर विश्वास नसतो आणि जेव्हा ते समोर येतात तेव्हा त्यांची शुद्ध हरवून जाते. त्याच्या कपाळावर घाम येतो आणि तो जागेवस पुतळा बनतो. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी दिसत आहे, जिने कीआरा अडवाणींची जागा घेतली आहे. ‘भूल भुलैया 2‘मध्ये कार्तिक आणि कियाराचा रोमान्स पाहायला मिळाला होता आणि तब्बूने डबल रोल केला होता.