“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte

“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte हिची शाळा
सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनने (Big Boss Marathi Season 6) सगळीकडे आग लावली आहे. घरातील प्रत्येक सदस्य अगदी पहिल्या आठवड्यातच आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तन्वी कोलते हिने सध्या पहिला आठवडा चांगलाच गाजवला आहे… सागर कारंडे (Sagar Karande) यांच्या प्रोफेशनची तिने रागात उडवलेली खिल्ली, किंवा घरातील इतर सदस्यांसोबत तिने केलेली भांडणं यावरुन घरातलं वातावरण तापलं आहे… आणि आता शनिवारी भाऊच्या धक्क्यावर तन्वीची रितेश देशमुख यांनी चांगलीच शाळा घेतली आहे…
सहाव्या सीझनच्या पहिल्या आठवड्याचा प्रोमो समोर आला असून यात रितेश भाऊ तन्वी कोलते हिला फैलावर घेताना दिसले आहेत. पहिल्या दिवसापासून तिचं घरात बऱ्याच जणांशी खटके उडले. रुचिता, सागर कारंडे, दिपाली सय्यद यांच्यासोबत झालेले तिचे वाद बरेच चर्चेत होते. घरात सतत आरडा ओरड करणे, विनाकारण दुसऱ्यांच्या भांडणात उडी घेणे यामुळे ती प्रेक्षकांमध्ये बरीच ट्रोल झाली. (Colors Marathi)

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की, रितेश तन्वीला बोलतात की,- तन्वी कोलते किती बोलते! तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन. तुम्हाला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की रडायचं असतं. तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झाला आहे… यावर तन्वी स्वतःची बाजू मांडायला जाते पण रितेश तिचं काही ऐकून घेत नाही…(Big Boss Marathi)
================================
हे देखील वाचा : “Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंच
================================
दरम्यान, या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या असून रितेश भाऊवर सगळे बरेच खुश झाले आहेत. “बरं झालं तन्वीची शाळा घेतली, आता तरी तन्वी गप्प राहील, तन्वीला ओरडण्याची गरज होती…” अशा प्रकारच्या कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत… त्यामुळे आता हा तर फक्त प्रोमो होता आता भाऊच्या धक्क्यावर अजून काय गंमती जमती होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…(Riteish Deshmukh)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi