Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

Big Boss 19: अमाल मलिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडील संगीतकार डब्बू मलिक यांनी मागितली माफी
बिग बॉस १९ सुरू होऊन एक महिना उलटला असून, या सीझनमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी उघडकीस येत आहेत. याच दरम्यान स्पर्धक अमाल मलिक (Amal Malik)सतत चर्चेत आहे. तो जवळपास प्रत्येक भागात कोणाशी ना कोणाशी वाद घालताना किंवा बॉलिवूडमधील किस्से शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच्या एका एपिसोडमध्ये त्याने सहस्पर्धक आवेझ दरबारविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याच्या या विधानावरून आवेझच्या वडिलांनी, ज्येष्ठ संगीतकार इस्माईल दरबार यांनी, अमालला सडेतोड उत्तर दिलं.या वादाची सुरुवात ‘बिग बॉस १९’ च्या एका भागात झाली, जेव्हा अमाल मलिकने असा दावा केला की, आवेझ दरबार आणि त्याची गर्लफ्रेंड नगमा मिराजकर यांना मिळालेलं यश त्याच्यामुळे आहे. अमालच्या म्हणण्यानुसार, त्याच्या गाण्यांमुळे या दोघांना प्रसिद्धी मिळाली. हा भाग प्रसारित होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आणि लवकरच इस्माईल दरबार यांनी मुलाखतीत अमालवर जोरदार टीका केली.(Big Boss 19)

इस्माईल दरबार यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आवेझ दरबारने आपल्या वडिलांच्या ओळखीचा फायदा घेतलेला नाही आणि त्याने स्वतःच्या मेहनतीवर आपली ओळख निर्माण केली आहे. ते म्हणाले की, अमाल मलिकची आवेझ दरबारशी तुलना करण्याची लायकीसुद्धा नाही. तसेच अमालने जर असं म्हटलं असेल की तो आवेझला काम देतो, तर आधी त्याने स्वतःचा बिझनेस सांभाळावा, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या मते, अमालचं नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उलट त्याला आवेझची मदत लागली, असं वास्तव आहे.

या वादावर पडदा घालण्यासाठी अखेर अमालचे वडील आणि संगीतकार डब्बू मलिक यांनी पुढाकार घेतला. एका मुलाखतीत त्यांनी अमालच्या विधानांची जबाबदारी घेतली आणि माफी मागितली. त्यांनी सांगितलं की, आवेझ आणि झैद ही दोघं त्यांना अत्यंत आवडतात आणि त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर नाव कमावलं आहे, जसं अमाल आणि अरमान मलिक यांनीही केलं आहे. त्यांनी इस्माईल दरबार यांच्याविषयी आदर व्यक्त करत सांगितलं की, कधी कधी बोलण्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला जातो आणि त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल माफी मागणं योग्य आहे.(Big Boss 19)
===============================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 मधला अवेज दरबार नगमा मिरजकरची प्रेमात फसवणूक करतोय?
===============================
डब्बू मलिक यांनी हेही स्पष्ट केलं की, वैयक्तिक पातळीवरील गोष्टी जास्त चर्चेत येणं टाळावं आणि सर्वांनी हा शो एक खेळ म्हणून पाहावा. त्यांनी आवेझ आणि झैद दोघांची प्रशंसा करत त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली. अमाल मलिकच्या वडिलांनी जाहीर माफी मागून वाद शमवण्याचा प्रयत्न केला असला, तरी अमाल पुन्हा एखाद्या नव्या वादात अडकतो का, की वडिलांचा सल्ला मानून आपलं बोलणं थांबवतो, हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.