Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ची दमदार एन्ट्री !
बिग बॉसच्या 19 व्या सीझनची प्रतिक्षा संपली असून प्रेक्षकांसमोर नवा सीझन रंगतदार अंदाजात आला आहे. या सीझनमध्ये सलमान खानने नेहमीप्रमाणे आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांची मने जिंकली. यंदा शोच्या फॉरमॅटमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. घरातील अनेक निर्णय सदस्यांच्या हाती देण्यात आले आहेत. बिग बॉस फारसा हस्तक्षेप न करता स्पर्धकांना त्यांचे प्रश्न स्वतः सोडवावे लागणार आहेत. म्हणजेच या घरात ‘लोकशाही’ची संकल्पना असेल, जिथे घरातील प्रत्येक निर्णय सदस्यांच्या मतदानावर अवलंबून असेल.(Bigg Boss 19)

याच दरम्यान मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे यंदा बिग बॉसच्या हिंदी घरात मराठी कलाकाराची एन्ट्री झाली आहे. लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा या शोचा 11 वा स्पर्धक ठरला आहे. प्रणित स्टेजवर आला तेव्हा सलमान खानने थेट मराठी भाषेत त्याच्याशी संवाद साधला. प्रणितने ही आपल्या खुमासदार विनोदाने स्टेजवर हशा पिकवला. सलमानने त्याला गंमतीत म्हटलं, “मला वाटलंच होतं की माझ्यावर तू येणारच”, त्यावर प्रणितने पटकन उत्तर दिलं, “नाही तुमच्यावर नाही येणार, नाहीतर मी उडेल”. या संवादाने प्रेक्षक आणि चाहत्यांचं भरपूर मनोरंजन झालं.

प्रणित मोरे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल 4 लाख 31 हजार फॉलोअर्स आहेत, तर युट्युब वर 10 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याने दोन हजारांहून अधिक पोस्ट केल्या असून त्यातील बहुतांश कॉमेडी व्हिडिओंना नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याच्या विनोदांमुळे तो सतत चर्चेत राहिला आहे आणि त्याच्या शैलीवर प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचंही लक्ष वेधलं आहे.(Bigg Boss 19)
=============================
हे देखील वाचा: Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर सज्ज; पाहा शानदार घराची पहिली झलक !
=============================
मात्र, प्रणितचा प्रवास वादविवाद शिवाय राहिलेला नाही. काही काळापूर्वी त्याने एका शोदरम्यान अभिनेता वीर पहाडिया याच्यावर विनोद केले होते. त्यानंतर शो संपल्यानंतर काही जणांनी प्रणितला मारहाण केली होती. या प्रकरणावर वीरने मात्र स्पष्ट केलं की त्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही. त्याने प्रणितची माफी मागत वाद शांत करण्याचा प्रयत्नही केला होता.बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे आपली कॉमिक टायमिंग, विनोदबुद्धी आणि वेगळा अंदाज घेऊन प्रेक्षकांना कितपत भुरळ घालतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मात्र एवढं नक्की की हिंदी बिग बॉसच्या घरात आता मराठी विनोदाचा ठसा उमटणार आहे आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डोस अजून दुप्पट होणार आहे.