‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19 मध्ये होणार २ वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ नावांची होतेय चर्चा !
‘बिग बॉस 19’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोला सुरुवात होऊन आता काही आठवडे झाले आहेत आणि शोने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. प्रत्येक आठवड्यात घरामध्ये काही ना काही मोठा ट्विस्ट घडताना दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यात शहनाज गिलचा (Shehnaj Gill) भाऊ शहबाज बदेशा (Shehbaz Badesha) याने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. त्याच्या आगमनामुळे घरातील वातावरणात बऱ्यापैकी उलथापालथ झाली असून, आता पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा रंगू लागली आहे. आगामी ‘वीकेंड का वार’ मध्ये दोन नवीन स्पर्धक घरात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. एक म्हणजे प्रसिद्ध गायिका टिया कर (Tia Kar) आणि दुसरी म्हणजे अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) . सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. टिया आणि शिखा यांची एन्ट्री झाल्यास घरात नव्या गटबाजीचे संकेत मिळत आहेत.(Big Boss 19)

टिया कर ही एक ओळखलेली गायिका आहे. तिने अनेक हिट गाणी गायली असून तिच्या आवाजात वेगळाच ठसका आहे. तिच्या घरात येण्याने एक सकारात्मक आणि मजेदार वातावरण तयार होऊ शकतं. तसेच, संगीताच्या माध्यमातून ती घरातील तणाव हलका करू शकते, असं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे, शिखा मल्होत्रा ही अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती थेट आणि मुद्देसूद बोलते. तिचा हा स्वभाव ‘बिग बॉस’च्या घरात तिला एक बिनधास्त आणि आक्रमक स्पर्धक बनवू शकतो. त्यामुळे ती घरात आल्यानंतर अनेक समीकरणं बदलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शो सुरू झाल्यापासून तान्या मित्तल हे नाव सतत चर्चेत आहे. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वागत्या स्वभावामुळे लक्षात राहिली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की, टिया आणि शिखा यांच्या एन्ट्रीनंतर तान्याची लोकप्रियता टिकून राहील का?(Big Boss 19)
============================
हे देखील वाचा: ‘Maharashtrachi Hasyajatra’ची लवकरच ‘गिनीज बुक’मध्ये होणार नोंद; ‘हे’ आहे कारण…
=============================
सध्या या वाईल्ड कार्ड एन्ट्रीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बिग बॉस 19’ दर आठवड्याला नव्या ट्विस्टसह प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, आणि या नव्या वाईल्ड कार्ड्समुळे खेळ आणखी रोचक होणार, हे नक्की!