डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

Bigg Boss 19: अमाल मलिकला सारख कन्फेशन रूममध्ये का बोलावले जाते? घरातून बाहेर पडताच कुनिकाने दिलं खरं उत्तर
‘Big Boss 19 ‘ चा फिनाले आता जवळ आलं असून, फक्त ८ स्पर्धक उरले आहेत. या सिझनच्या खेळात गौरव खन्ना (Gaurav Khanna) फिनाले वीकमध्ये जाणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. मागील आठवड्यात अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunica Sadanand) घराबाहेर पडली आणि त्यानंतर तिने एक महत्त्वाचं विधान केलं आहे. बिग बॉसमध्ये संगीतकार अमाल मलिक (Amal Malik) याला वारंवार कन्फेशन रूममध्ये बोलावलं जात असल्याचं आणि गेममध्ये त्याला ‘फेवर’ केलं जात असल्याचं अनेकदा सांगितलं जात होतं. या आरोपांवर कुनिकाने स्पष्ट स्पष्टीकरण दिलं आहे. (Bigg Boss 19)

बिग बॉस १९ बद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत. यामध्ये एक मोठी चर्चा म्हणजे अमाल मलिकला कन्फेशन रूममध्ये वारंवार बोलावलं जात असल्याचं आणि त्याला फेवर दिलं जात असल्याचं. काही एक्स स्पर्धकांनी हे आरोप केले होते की अमालला घरात विशेष सवलती दिल्या जात आहेत. पण कुनिकाने या सर्व चर्चांवर तासभराचं स्पष्टीकरण दिलं.

कुनिकाने म्हटलं की, “अमालला कन्फेशन रूममध्ये बोलावले जाण्याचं कारण कधीही काही विशेष मार्गदर्शन नाही, तर ते व्यवसायिक कारणामुळे होतं. अमालच्या काही म्यूझिक ट्रॅकचा लाँच प्लॅन होता. त्याच्या गाण्यांचा निर्णय आणि व्यवस्थापन करण्यासाठी तो कन्फेशन रूममध्ये जात असे.” तिने असंही स्पष्ट केलं की, अमाल मलिक कन्फेशन रूममध्ये केवळ त्याच्या कामाची व्यवस्था करत होता. त्याला ‘कोणता ट्रॅक कधी रिलीज करायचा’ आणि ‘कुठे ठेवलंय संगीत’ अशा गोष्टी बिग बॉसच्या टीमला देऊन त्याच्या टीमपर्यंत त्या माहितीचा पोहोचवण्याचं काम होतं. कुनिकाने सांगितलं की, अमालला मिळालेल्या मदतीसारखीच मदत तिला देखील मिळाली होती. “ही सुविधा केवळ अमालसाठी नाही, तर मी स्वतः ही त्याचा लाभ घेतला होता,” असं ती म्हणाली. तिच्या स्पष्टीकरणामुळे अमाल मलिकवर असलेले आरोप काही प्रमाणात शांत होऊ शकतात.(Bigg Boss 19)
===========================
===========================
त्यानंतर, अमाल मलिकचा भाऊ अरमान मलिक याने या स्पष्टीकरणावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिलं, “थँक यू कुनिका मॅम, या सर्व गोष्टी स्पष्ट केल्याबद्दल.”कुनिकाच्या या स्पष्टीकरणामुळे अमाल मलिकवर उचललेल्या आरोपांना थोडं हलकं केलं गेलं असून, या प्रकरणावर पडदा पडला आहे.