
Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली हात जोड़ून विनंती पण….
Bigg Boss Marathi ’च्या नव्या सीझनला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच घरातील वातावरण तापू लागलं आहे. घराचा दरवाजा उघडताच सदस्यांमध्ये रणनीती, गटबाजी आणि मतभेद स्पष्टपणे दिसू लागले आहेत. पहिल्या काही दिवसांतच वादांची मालिका सुरू झाली असून, काही स्पर्धक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पहिल्याच दिवशी तन्वीसोबत झालेला वाद आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबतची तीव्र शाब्दिक चकमक यामुळे रुचिता जामदार (Ruchita Jamdar) सध्या घरातील महत्त्वाची खेळाडू ठरताना दिसते आहे. तिच्या प्रत्येक हालचालीकडे घरातील सदस्यांसह प्रेक्षकांचेही लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता समोर आलेल्या नव्या प्रोमोने उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. (Bigg Boss Marathi 6)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या खेळात निर्णायक ठरणारी ‘पॉवर की’ चर्चेचा विषय बनली आहे. एका खास टास्कदरम्यान ही पॉवर की पॉवर चेंबरमध्ये प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं बिग बॉस स्पष्ट करताना दिसतात. मात्र, या शक्तीचा वापर करताना रुचिताकडून मोठी चूक झाल्याचे संकेत प्रोमोमध्ये मिळत आहेत.

‘पॉवर की’ बाबत हलगर्जीपणा रुचितासाठी महागात पडू शकतो, अशी चर्चा घरात सुरू झाली आहे. या चुकीचा परिणाम तिच्यावर नेमका कसा होणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. घरकामाची शिक्षा मिळणार की थेट नॉमिनेशनचा सामना करावा लागणार, हे येणाऱ्या भागात स्पष्ट होईल. प्रोमोमध्ये आणखी एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळतो. करण पॉवर की देण्यास स्पष्ट नकार देतो, तर रुचिता बिग बॉसकडे तक्रार करताना दिसते की पॉवर की करणकडे आहे. परिस्थिती इतकी टोकाला जाते की रुचिता त्याची माफी मागताना आणि पाया पडताना दिसते, ज्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसतो. (Bigg Boss Marathi 6)
==========================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: ‘तुझं तोंड शेणात घाल..’ पहिल्याच दिवशी घरात जोरदार राडा!
==========================
रितेश देशमुखच्या ‘लयभारी’ शैलीत सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू गंभीर आणि धोकादायक वळणावर येत आहे. अवघ्या पहिल्या आठवड्यातच पॉवर गेम, भावनिक नाट्य आणि रणनीती यांचा भडिमार पाहायला मिळत असून, पुढील भागांमध्ये खेळ आणखी रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.