Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज;

Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish Deshmukh ने Tanvi Kolteला चांगलच झापलं!
Bigg Boss Marathi 6 सुरू होऊन पहिला आठवडा पूर्ण होत आला असून, या आठवड्यात घरातील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये मतभेद, वाद आणि टास्कमधील तणाव यामुळे घरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. जसजसे दिवस पुढे गेले, तसतसं प्रत्येक स्पर्धकाचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर उलगडू लागलं. बिग बॉस मराठीचा सर्वात चर्चेत असलेला भाग म्हणजे ‘भाऊचा धक्का’. प्रेक्षक या भागाची नेहमीच उत्सुकतेने वाट पाहतात.(Bigg Boss Marathi 6)

अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) या भागाचं सूत्रसंचालन करतो. आठवडाभरात घडलेल्या घटनांचा तो आढावा घेतो, चांगली कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं कौतुक करतो, तर नियमभंग किंवा अतिरेक करणाऱ्यांना थेट जाब विचारतो. आता सीजन ६ मधील पहिल्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये अभिनेत्री तन्वी कोलते विशेष चर्चेत आली आहे. या सीझनच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते तन्वीच्या वागणुकीने. घरात प्रवेश केल्यापासूनच तिचे अनेक स्पर्धकांशी वाद झाले. रुचिता, सागर कारंडे आणि दीपाली सय्यद यांच्यासोबत झालेले खटके सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले.

घरात सतत बोलणं, इतरांच्या भांडणात मध्ये पडणं आणि आरडाओरड करणं यामुळे तन्वीवर प्रेक्षकांनी टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुखने तिची चांगलीच शाळा घेतल्याचं प्रोमोमध्ये दिसतं. प्रोमोमध्ये रितेश तन्वीला थेट म्हणतो की, ती घरातील ‘तंटा क्वीन’ आहे. सतत बोलणं, भांडणं आणि नंतर रडणं, असा तिचा पॅटर्न असल्याचं तो स्पष्टपणे सांगतो. तिच्या जिभेला ब्रेक नसल्याचंही तो सुनावतो. तन्वी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते, मात्र रितेश तिचं म्हणणं ऐकून घेत नाही, हे दृश्य प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
===============================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात नेमकं झालं तरी काय ?
===============================
हा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केलं आहे. अनेकांनी “बरं झालं तन्वीला समज दिली”, “आता तरी ती शांत बसेल”, “ही शाळा गरजेची होती” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.तन्वी कोलते ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ मध्ये सिंचना या भूमिकेत झळकली होती. आता बिग बॉसच्या घरात तिचा हा आक्रमक स्वभाव तिला पुढे किती फायदेशीर ठरणार, हे येणाऱ्या भागांमध्ये पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.