Bigg Boss OTT 2: पलक पुरसवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर,7 दिवसांचा राहिला घरातला प्रवास
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी सीझन 2 ला सुरुवात झाली आहे. या सीझन चा प्रीमियर होऊन अवघा एक आठवडाच झाला असून एवढ्या कमी दिवसाताच हा ओटीटी सीझन चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटी सीझन २ सीझन १ च्या पेक्षा जास्त चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी सीझन २ मध्ये सलमान खानसोबतचा पहिला वीकेंड वॉर खूपच रोमांचक ठरला. या वीकेंडला सलमान खानने अनेक स्पर्धकांची उलट तपासणी घेतली. शोच्या सुरुवातीला पुनीतला सलमान खानने त्याच्या कृत्यामुळे बिग बॉसच्या घरातून हाकलून दिले होते. तर आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे पलक पुरसवानी ला घराबाहेर काढण्यात आलं आहे . ज्यानंतर पलक खुप भावूक झालेली पहायला मिळाली. (Palak Purswani)
बिग बॉस ओटीटी सीझन 2 चे एपिसोड जसजसे पुढे जातील तसतसे स्पर्धक घराबाहेर पडत राहतील. या आठवड्यात सलमान खानने बिग बॉसच्या घरातील सदस्य पलक पुरसवानी ला कमी मतांमुळे बाहेर टाकण्यात येत असल्याची पुष्टी केली होती. हे ऐकून पलक भावूक झाली. त्याचवेळी पलकने घरच्यांचा निरोप घेत एवढी मोठी संधी दिल्याबद्दल बिग बॉसचे आभार सुद्धा मानले. घराबाहेर पडताना पलकचे मित्र जिया शंकर आणि आकांक्षा पुरी यांच्या डोळ्यात अश्रू होते. बिग बॉस ओटीटी सीझन २ आपल्याला जिओ सिनेमा आणि वूटवर मोफत पाहायला मिळतो.
शोच्या सुरुवातीला सलमान खानने आकांक्षा पुरीला ही तिच्या कृत्याबद्दल फटकारले . ज्यानंतर ती बेबी धुर्वेला सांगते की उद्या तिचा वाढदिवस आहे आणि तिला तो साजरा करायचा आहे कारण तिला कधीही काढून टाकल जाऊ शकते असे तिला वाटते. यानंतर बेबीका धुर्वे केक कापून बाकीच्या स्पर्धकांमध्ये वाटून घेते. त्यानंतर सलमान खान म्हणाला की, ती एलिमिनेट झाली आहे आणि तिने घराबाहेर पडावे. (Palak Purswani).
===========================
हे देखील वाचा: Nora Fatehi बनली आंतरराष्ट्रीय गायिका; तिच्या सेक्सी व्हिडीओने घातला धुमाकूळ
===========================
काही वेळाने सलमानने सांगतो की तो फक्त बेबीकाशी मस्करी करत होता. या आठवड्यात बेबीका धुर्वे, अविनाश सचदेव, जिया शंकर आणि पलक पुरसवानी हे तिघे जण घरातून बाहेर पडण्याच्या यादीत सामिल होते.