Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

The Bengal Files: काश्मिरने रडवले आता बंगाल फाईल्स घाबरवणार!
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files)’ या सत्य घटनांवर आधारित चित्रपटांनंतर आता ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ (The Bengal Files : Right to Life) हा अंगावर काटा आणणारा आणि समाजातील आणखी एक दाहक सत्य लोकांसमोर आणणारा चित्रपट घेऊन येणार आहेत. नुकताच या चित्रपटाला मन हेलावून टाकणारा टीझर प्रदर्शित झाला आहे.(Bollywood News)

‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ चित्रपटाच्या टीझरमध्ये भारताच्या इतिहासातील कधीच जगासमोर न आलेली बाजू मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. टीझरमध्ये शिवा पंडित, अमर, गांधीजी, बॅनर्जी, भारती, माँ भारती ही काही पात्र आक्रोश करताना दिसत आहेत. शिवाय, टीझरमध्ये काश्मीर फाईलने तुम्हाला रडवलं असेल तर बंगाल तुम्हाला घाबरवेल असं म्हटलं आहे. (Entertainment)
================================
हे देखील वाचा: Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापटावर आधारित चित्रपट इतिहास रचणार?
=================================
दरम्यान, ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून,निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. तसेच, विवेक अग्निहोत्रींच्या‘फाइल्स ट्रिलॉजी’चा हा शेवटचा भाग असणार आहे. देशभरात हा चित्रपट. ५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Bollywood News)
Get Latest Marathi Entertainmentupdate | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi