
Blue Family Entertainer फिल्म्स म्हणजे काय?
आपल्याला Entertainment हवं असेल तर आपण चित्रपट पाहतो… पण त्यातही प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे जॉनर्स असतात… म्हणजे काय? तर फॅमेली ड्रामा, रोमॅंटिक, थ्रिलर, क्राईम-थ्रिलर, कॉमेडी, रॉम-कॉम किंवा अलीकडे लोकप्रिय झालेला जॉनर हॉरर-कॉमेडी… पण तुम्हाला माहित आहे का या प्रकारांमध्ये आता ‘ब्लू फॅमिली एंटरटेनर’ हा नवा जॉनर आला आहे…. आता हा जॉनर नेमकी काय आहे आणि यात कोणते चित्रपट येतात चला तर जाणून घेऊयात…(Bollywood Films Generes)

खरं तर बॉलिवूडला आजवर ‘ब्लू फॅमिली एंटरटेनर’ (Blue Family Entertainer Movies Of Bollywood) चित्रपटांनी जगवलं आहे असं म्हणावं लागेल… कारण या जॉनरमध्ये रोमॅन्स,फॅमेली ड्रामा, कॉमेडी या सगळ्यांचं mixture आपल्याला पाहायला मिळतं… विशेष म्हणजे अगदी लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या चित्रपटांचा आनंद कुटुंबासोबत घेऊ शकतात… कुठेच फार डार्क कॉमेडी किंवा अडल्ट जॉक्स यात नसतात… कन्फ्युज होऊ नका मी चित्रपटाचं नाव सांगितल्यावर तुम्हाला हा Genere अधिक सोप्या पद्धतीने समजेल… तर या जॉनरमध्ये येणाऱ्या चित्रपटांची नावं आहेत ‘दे दे प्यार दे २’ (De De Pyaar De 2), ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’, ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’… (Bollywood Movies)

आता चित्रपटांची नावं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा नवा जॉनर नाहीये तर अगदी ९०च्या दशकापासूनही याच जॉनरचे चित्रपट प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहात मोठे झाले आहेत… म्हणजे कोणते? तर ‘हम आपके है कौन!’, ‘हम साथ साथ है’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘३ इडियट्स’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि असे बरेच चित्रपट… स्पेसिफिकली राजश्री प्रोडक्शनचे सगळे चित्रपट खरं तर ‘ब्लू फॅमिली एंटरटेनर’ या जॉनरमध्ये मोडतात… चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना फॅमेली वॅल्यूज, आपली संस्कृती, प्रेम हे सारं काही आजच्या नव्या पिढीला देखील समजत राहील हाच या जॉनर्सच्या चित्रपटांचा आणि मेकर्सचा उद्देश आहे… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Web Series Review Baai Tujhyapayi: वयात आलेल्या प्रत्येक मुलीची करुण कहाणी!
================================
अलीकडे दुर्दैवाने ‘ब्लू फॅमिली एंटरटेनर’ चित्रपटांची संख्या खुप कमी झाली आहे… आता तर extreme violence किंवा डार्क रोमॅंटिक चित्रपटच फारसे येत असल्यामुळे फॅमेली ऑडियन्स बॉलिवूडपासून जरा लांब गेलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही… परंतु, येत्या काळात एकत्र कुटुंब टिकावीत असं जर का वाटत असेल तर फॅमेली ऑरिएंटेड चित्रपटही येणं तितकंच गरजेचं आहे…. बॉलिवूडच्या अपकमिंग चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘रामायण’, ‘धुरंधर’, ‘लव्ह एन्ड वॉर’, ‘डॉन ३’, ‘Animal Park’ असे बरेच चित्रपट येत्या काळात रिलीज होणार आहेत… (Upcoming Bollywood Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi